अभिनेता कमाल खान पुन्हा झाला ट्रोल; वाचा नेमकं काय केलंय त्याने....

KRK
KRK
Updated on

मुंबई ः  अभिनेता कमाल खान हा नेहमीच वादग्रस्त विधानामुळे आणि ट्विटमुळे चर्चेत असतो. नेहमी एखादा वाद तो निर्माण करतो आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करतो. आता त्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांना सल्ला दिला आहे. सध्या भारतात चित्रीकरण बंद आहे. सरकार कधी परवानगी देईल हे सांगता येत नाही. त्यामुळे हिंदी चित्रपट निर्मात्यांनी न्यूझीलंडला जाऊन चित्रीकरण करावे, असे ट्विट त्याने केले. त्याचे हे ट्विट सगळीकडे व्हायरल झाले आणि काही तास उलटत नाहीत तोच शेकडो नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच फटकारले. त्याच्या या ट्विटची बाॅलीवूडसह सगळ्यांनी खिल्ली उडविली आहे.

सध्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकार आणि सगळ्या राज्यातील सरकारे कामाला लागलेली आहेत. कोरोनाचा अटकाव करण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रात पाचव्यांदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. चित्रपटगृहे तसेच चित्रीकरण बंद आहे. सरकारच्या परवानगीनंतरच चित्रीकरण सुरू होणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी सरकारकडे चित्रीकरणासाठी परवानगी मागितली आहे. सरकार याबाबतीत विचारविनिमय करीत आहे. 

काही नियम आणि अटींसह सरकार लवकरच परवानगी देईल अशी निर्मात्यांना आशा आहे. असे असतानाच आता कमाल खानने ट्विट आता न्यूझीलंडला जाऊन हिंदी चित्रपट निर्मात्यांनी चित्रीकरण करावे, असा सल्ला दिला आहे. त्याने पुढे आपल्या ट्विटमध्ये असेही म्हटले आहे, की न्यूझीलंड हा जगातील पहिला देश आहे की जेथे कोरोना नाही. त्यामुळे हिंदी चित्रपट निर्मात्यांनी तेथे जाऊन चित्रीकरण करावे. तेथील वातावरणही मुंबईपेक्षा छान आहे. कमाल खानच्या या ट्विटची अनेकांनी खिल्ली उडवली आहे. अनेक जणांनी सोशल मीडियावर त्याला फटकारले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.