भाजपचे माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी स्वतःच्या वक्तव्यामुळे आपल्याच पक्षाला अडचणीत आणत असतात. तसेच ते मोदी सरकारच्या धोरणांवर सवाल उपस्थित करत असताना दिसतात. नुकतेच सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी मोदी समर्थकांवर एक ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला होता. ते म्हणाले, की मोदींचे अर्धशिक्षित भक्त माझ्या पीएचडीचा मुकाबला करु शकत नाही. यावर बाॅलीवूड अभिनेत्याने टीका केली आहे. (Kamal R Khan Comment On Subramanian Swamy, Says Modi Does Not Dare To Remove Him)
कमाल आर खानने (KRK) ट्विट करत लिहिले, की सुब्रमण्यम स्वामी भाजपवर रोज टीका करतात. मात्र मोदी त्यांना पक्षातून काढण्याची हिंमत करित नाही. यावर युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. राज नावाचा यूजर म्हणतो, तुम्ही राजकारण राहू द्या ! तुम्ही फक्त चित्रपट समीक्षेवर लक्ष द्या. याला म्हणतात वत्स फिरकी घेणे. शत्रूघ्न सिन्हा आणि यशवंत सिन्हा यांना विचार, असा सल्ला विजय नावाच्या यूजरने दिला. कविता नावाची यूजर म्हणते, याला हिंमत नाही म्हणत याला बेईज्जती म्हणतात. जसे तुम्हाला कोणताही मोठा अभिनेता प्रतिक्रिया देत नाही. कारण त्यांना माहीत आहे, की तुम्ही कोणत्या प्रकारच्या आहात. एक यूजर म्हणतो एसएस आणि इतर काय म्हणतात, याने तुम्हाला काय फरक पडतो ? तुम्हाला आपले आडनाव आणि त्याचा इतिहासाविषयी अधिक चिंता करायला हवी. मग आम्ही तुम्हाला आठवण करुन द्यावी का? बाबर.. मोगल... औरंगजेब. जाऊ द्या हे राहू द्या.
गेल्या काही वर्षांमध्ये सुब्रमण्यम स्वीमा यांनी आरोप केला होता, की भाजप (BJP) आयटी सेल त्यांच्यावर निशाणा साधत आहे. भाजप आयटी सेल खोट्या खात्यांवरुन माझ्याविरुद्ध ट्विट करत असल्याचे ते म्हणाले होते. याविषयीची तक्रार त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडेही केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.