Women Reservation Bill: "पंतप्रधान मोदी आणि हे सरकार..", महिला आरक्षण विधेयकाबाबत कंगना अन् इशा गुप्ताची प्रतिक्रिया चर्चेत..

Kangana Ranaut and  Esha Gupta 
 on Women Reservation Bill
Kangana Ranaut and Esha Gupta on Women Reservation Bill Esakal
Updated on

Kangana Ranaut On Women Reservation Bill: संसदेच्या विशेष अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. संसदेच्या नवीन इमारतीमध्ये हे अधिवेशन संपन्न झाले. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले. नारीशक्ती वंदन अधिनियम असं नाव देण्यात आले आहे.

नारी शक्ती वंदन अधिनियम कायद्याच्या माध्यमातून महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. या विधेयकाबाबत अभिनेत्री कंगना राणौत हिने देखील या विधेयकाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Kangana Ranaut and  Esha Gupta 
 on Women Reservation Bill
Singham Again: ना दीपिका ना कतरिना या प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्रीची रोहित शेट्टीच्या सिंघममध्ये एंट्री!

कंगनाने नुकतीच नव्या संसद भवनात हजेरी लावली होती. यावेळी तिने मीडियासोबत बोलताना या निर्णयाबाबात आनंद व्यक्त केला आहे.

नारीशक्ती वंदन अधिनियम विधेयकाबाबत बोलतांना कंगना म्हणाली की, "ही एक अद्भुत कल्पना आहे, हे सर्व आपले माननीय पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारमुळे आणि त्यांच्या महिलांच्या विकासाबाबत असलेल्या चांगल्या विचारसरणीमुळे आहे."

यापुर्वी देखील कंगनाने तिच्या ट्विटरवर लिहिले होते की, 'आपण सर्वजण एका नव्या युगाचे साक्षीदार आहोत, आमची वेळ आली आहे, ही वेळ आहे मुलींची... आता तुमचा अपमान होणार नाही, ही वेळ आहे वृद्ध महिलांची... नव्या जगात आपले स्वागत आहे, आपल्या स्वप्नांच्या भारतात आपलं स्वागत आहे..'

Kangana Ranaut and  Esha Gupta 
 on Women Reservation Bill
Ganesh Chaturthi 2023: 'आई कुठे काय करते'च्या सेटवर गणरायाचं आगमन! 'चांद्रयान 3' चा देखावा करत कलाकारांनी दिली मानवंदना

तर कंगनाशिवाय अभिनेत्री ईशा गुप्ताही देखील संसद भवनात पोहोचली. यावेळी कंगना म्हणली की, "पीएम मोदींनी केलेले हे एक सुंदर काम आहे. ही अतिशय प्रगतीशील कल्पना आहे. या आरक्षण विधेयकामुळे महिलांना समान अधिकार मिळेल. हे आपल्या देशासाठी एक मोठं पाऊल आहे." पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिले आणि ते पूर्णही केले...''. यावेळी हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि गायिका सपना चौधरी देखील संसदेत आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.