Kangana Ranaut In Ayodhya: कंगना अयोध्येला पोहचली, साफसफाईला लगेच सुरुवात केली!

कंगना ही बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेतील अभिनेत्री म्हणून ओळखली (Kangana Ranaut Latest News) जाते. कंगनाचा असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी ती तिच्या एखाद्या वक्तव्यामुळे चर्चेत आली नसेल.
Kangana Ranaut Ayodhya Ram Mandir Cleanness
Kangana Ranaut Ayodhya Ram Mandir Cleannessesakal
Updated on

Kangana Ranaut Ayodhya Ram Mandir Cleanness : देशभरामध्ये उद्या होणाऱ्या प्रभु श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची (Ayodhya Ram Mandir Latest News) तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी देशभरातून वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणाऱ असल्याचे सांगण्यात येणार आहे. या सगळ्यात अभिनेत्री कंगनाच्या त्या व्हिडिओ (Kangana Bollywood Actress) नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडलं आहे.

कंगना ही बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेतील अभिनेत्री म्हणून ओळखली (Kangana Ranaut Latest News) जाते. कंगनाचा असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी ती तिच्या एखाद्या वक्तव्यामुळे चर्चेत आली नसेल. कंगनाचा प्रत्येक दिवस हा वेगळ्या बातमीचा, प्रतिक्रियेचा, वक्तव्याचा (Kangana Ram Mandir Ayodhya) असतो. त्यावरुन तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे तिला न्यायालयातही जावं लागलं आहे. मात्र ऐकेल आणि शांत बसेल ती कंगना कसली...

राम मंदिराच्या उद्घघाटन सोहळ्याविषयी बोलायचे झाल्यास यापूर्वी बॉलीवूड आणि साऊथ विश्वातील अनेक सेलिब्रेटींना या सोहळ्याचे निमंत्रण (Ram Mandir Bollywood celebrity Invitation) देण्यात आले आहे. त्यात बिग बी अमिताभ बच्चन, रजनीकांत, रणवीर सिंग, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रणदीप हुडा, अनुष्का कपूर, विराट कोहली यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे हा सोहळा एका अर्थी पूर्णपणे वेगळा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कंगनासह आता कित्येक सेलिब्रेटी हे अयोध्येकडे निघाले आहेत. कंगनानं अयोध्येमध्ये पोहचताच तिथे साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी कंगना तिच्या बहिणीसह तिथे पोहचली होती. तिचा तो व्हिडिओ आणि फोटो पाहून नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. कंगनाला यावेळी विचारलेल्या प्रश्नावर ती म्हणाली....

आम्ही साफ सफाईच्या माध्यमातून लोकांना, भक्तांना आणखी प्रेरित करतो आहोत. त्यांनी साफ सफाईचे महत्व समजावून घ्यावे यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. जगभरातून या शहरामध्ये भाविक येणार आहेत त्यासाठी स्वच्छता जास्त महत्वाची आहे. आता अयोध्या खूपच सुंदर दिसते आहे. असेही कंगनानं तिच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.