Kangana Ranaut On Adah Sharma The Kerala Story: बॉलिवूडमधील पंगा क्विन कंगना रणौत ही नेहमीच चर्चेत असते. ती असं व्यक्तीमहत्व आहे जे काही न करताही चर्चेत येतच. मनोरजंन विश्व असो किंवा राजकारण असो कंगना ही नेहमीच अनेक विषयावर तिचं परखड मत व्यक्त करत असते.
ती तिच्या पोस्ट आणि ट्विटवरुन अनेकांवर निशाणा साधत असते. त्यामुळे तिच्यावर टिकाही होत असते.
दरम्यान आता पुन्हा तिने असं काही वक्तव्य केलयं की त्यामुळे ती चर्चेत आली आहे. कंगनाने सध्या वादात अडकलेल्या अदा शर्माच्या द केरळ स्टोरीवर याआधीही वक्तव्य केलं होत आता पुन्हा तिने 'द केरळ स्टोरी' चित्रपटाच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
अदा शर्माच्या चित्रपटाच्या कथेवरून आतापर्यंत बरेच वाद झाले आहेत. 'द केरळ स्टोरी'वर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. नेत्यापासून ते अभिनेत्यापर्यंत सर्वजण चित्रपटाबाबत त्याचं मत मांडताना दिसतात.
इतकच नाही तर नुकतचं बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी याबाबत आपले मत मांडले होते. त्यातच कंगनानेही सीबीएफसीच्या मंजुरीनंतरही काही राज्यांनी 'केरळ स्टोरी'वर बंदी घालणे चुकीचे असल्याचं म्हंटलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगनाने चित्रपटावर बंदी घालणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच 'सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने पारित केलेल्या चित्रपटावर बंदी घालणं हा तर संविधानाचा अपमान असल्याच तिनं सांगितलं आहे'.
सुदिप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटात केरळमधील महिलांना आयसआय दहशतवादी गटात धर्मांतर करण्यास भाग पाडलं जात असल्याची कथा सांगितली आहे. ही गोष्ट समोर आल्यानंतर केरळ सरकार दिग्दर्शकावर आपली प्रतिमा डागाळल्याचा आरोप करत आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांतून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने होत आहे.
या चित्रपटाबाबत दोन गट पहायला मिळत आहे. ज्यात एक गट चित्रपटाला पाठिंबा देत आहे तर दुसरा गट या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणत आहे. काही राज्यांनी या चित्रपटाला करमूक्त केलं तर काहींनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती.
पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू सरकारने चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारच्या राज्यात चित्रपटावर बंदी घालण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे आता त्यातच कंगनाच्या या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.