Kangana Emergency: या तारखेला पुन्हा लागणार 'आणीबाणी', कंगनाच्या सिनेमाची रिलीज डेट समोर

कंगना रणौत दिग्दर्शित आगामी 'इमर्जन्सी' ची रिलीज तारीख जाहीर केली आहे,
kangana ranaut emergency release date out now
kangana ranaut emergency release date out nowSAKAL
Updated on

Kangana Ranaut Emergency Release Date News: कंगना रणौतच्या आगामी "इमर्जन्सी" सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. याआधी सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये तिच्या पॉवर-पॅक परफॉर्मन्सने देशाला आश्चर्यचकित केले,

ज्यामध्ये ती भारताची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसली. कंगना रणौतने नुकतंच आणखी एक व्हिडिओ फुटेज आणले आहे. कंगना रणौत दिग्दर्शित आगामी 'इमर्जन्सी' ची रिलीज तारीख जाहीर केली आहे,

kangana ranaut emergency release date out now
वैदेहीचं कॉलेज कोणतंय माहीतीये का Vaidehi Parshurami

इमर्जन्सीच्या मोशन पोस्टरमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फर्स्ट लूक समोर आलाय. मोशन पोस्टरमध्ये पाहायला मिळतं कि भारतात इमर्जंसी लागू झालीय.

नागरिकांना पोलीस मारत आहेत. त्यांना अटक होत आहे. वर्तमानपत्रात इमर्जन्सीबद्दल छापून येत आहे. देशातले बडे बडे नेते जेलमध्ये आहेत.

आणि अशातच इंदिरा गांधींच्या हाती सर्व सूत्र आहेत. असा मोशन पोस्टर पाहायला मिळतोय. 24 नोव्हेंबर 2023 रोजी इमर्जन्सी सिनेमा रिलीज होणार आहे.

आणीबाणी हा आपल्या इतिहासातील सर्वात महत्वाचा आणि काळा अध्याय आहे. जो तरुण भारताला माहित असणे आवश्यक आहे.

ही एक महत्त्वाची कथा आहे आणि मी प्रतिभावान अभिनेते, स्वर्गीय सतीश कौशिकजी, अनुपमजी, श्रेयस तळपदे, महिमा आणि मिलिंद सोमण यांचा या सर्जनशील प्रवासाची एकत्र सुरुवात केल्याबद्दल आभारी आहे.

भारताच्या इतिहासातील हा उल्लेखनीय भाग मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी मी उत्सुक आहे. भारत चिरंजीव!" अशा भावना कंगनाने व्यक्त केल्यात.

kangana ranaut emergency release date out now
Neena Gupta: पतीच्या शारिरीक गरजा भागवणे हे मुलीचं कर्तव्य... नीना गुप्तांच्या विधानाने चर्चांना उधाण

मणिकर्णिका फिल्म्स प्रस्तुत इमर्जन्सी सिनेमाची निर्मिती कंगनाने केली आहे. याशिवाय तिने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. रितेश शाहची पटकथा आहे. इमर्जन्सी सिनेमात कंगना रणौत भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटात दिवंगत अभिनेते सतीश कौशिक झळकणार आहेत, अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी आणि मिलिंद सोमण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.