Kangana Ranaut: कंगना रणौतकडून न्यूरालिंक कॉर्पबाबत इलॉन मस्कचे समर्थन, देव अन् ऋषींशी केली तुलना

Kangana Ranaut: कंगनाने याची सत्ययुगशी तुलना केली आहे. नास्तिक धर्मग्रंथांवर विश्वास ठेवत नाहीत.आमचे देव आणि ऋषींनी हे सर्व तंत्रज्ञान वापरले. लवकरच हे सर्व पुन्हा पाहायला मिळणार आहे, असे कंगना म्हणाली.
Kangana Ranaut
Kangana Ranaut
Updated on

Kangana Ranaut: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने ब्रेन चिप निर्माता इलॉन मस्कच्या न्यूरालिंक कॉर्पला पाठिंबा दिला आहे. इलॉनचे हे पाऊल लोकांना त्यांच्या मनाने संगणक नियंत्रित करण्यास सक्षम करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.  

कंगनाने याची सत्ययुगशी तुलना केली आहे. नास्तिक धर्मग्रंथांवर विश्वास ठेवत नाहीत.आमचे देव आणि ऋषींनी हे सर्व तंत्रज्ञान वापरले. लवकरच हे सर्व पुन्हा पाहायला मिळणार आहे, असे कंगना म्हणाली.

इलॉन मस्कच्या ट्विटनंतप कंगना राणौतने आपल्या ऋषी-देवतांचं स्मरण केलं. इलॉनने ट्विट केले होते की, पहिले न्यूरालिंक उत्पादन टेलिपॅथी आहे. याच्या मदतीने तुम्ही फक्त विचार करून तुमचा फोन किंवा कॉम्प्युटर आणि त्यांच्याकडून कोणतेही उपकरण नियंत्रित करू शकाल. (Latest Entertainment News)

Kangana Ranaut
Maharashtra Bhushan Award: अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

याला रिट्विट करत कंगनाने लिहिले आहे की, सत्ययुग प्रामुख्याने या तंत्रज्ञानामुळे / न बोलता संवाद साधण्याच्या क्षमतेमुळे लक्षात राहतो. जर आपण आपल्या जीवनात हे पाहिले तर आपल्याला शास्त्रात वर्णन केलेल्या देवता आणि ऋषींनी वापरलेल्या तंत्रज्ञानाची कल्पना येईल. कारण हे अनेक तथाकथित नास्तिकांना माहीत नसल्यामुळे, किंवा पाहिलेले नसल्यामुळे समजून घेणे हे मोठे आव्हान आहे. कारण आपल्या वेदांतील प्रत्येक गोष्ट त्यांना खोटी वाटते.

Kangana Ranaut
Atif Aslam: पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीनंतर अतीफ अस्लमचं ७ वर्षांनी बॉलिवूड कमबॅक, या सिनेमात गाणार गाणं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.