Kangana Ranaut: राष्ट्रीय पुरस्कार हुकल्याने कंगना नाराज, सोशल मिडीयावर पोस्ट करुन सांगितलं मनातलं दुःख

राष्ट्रीय पुरस्कार हुकल्याने कंगनाने तिच्या मनातलं दुःख सोशल मिडीयावर शेअर केलंय
kangana ranaut on not getting national awards 2023 for her movie Thalaivii
kangana ranaut on not getting national awards 2023 for her movie ThalaiviiSAKAL
Updated on

National Awards 2023 : काल गुरुवारी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली. कंगना रणौतला सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या कॅटेगरीत नामांकन मिळालं होतं. पण कंगनाला थलाईवी सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात नामांकन होतं.

पण कंगनाला राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावर स्वतःचं नाव कोरता आलं नाही. कंगनाऐवजी आलिया भट आणि क्रिती सेनन या दोघींना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यानंतर कंगनाने सोशल मिडीयावर पोस्टच्या माध्यमातुन स्वतःचं दुःख मांडलंय.

kangana ranaut on not getting national awards 2023 for her movie Thalaivii
Gadar 2: सिनेमाने बक्कळ कमावले, पण संगीतकार उत्तम सिंग यांनी आरोप लावले, गदर 2 वादाच्या भोवऱ्यात

कंगना राणौत सोशल मिडीयावर पोस्ट करुन लिहीते

कंगना राणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या नोटमध्ये लिहिले की, "राष्ट्रीय पुरस्कार 2023 च्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन. हे जाणून घेणे खरोखरच जादुई आहे की, राष्ट्रीय पुरस्कार हा असा एक सोहळा आहे जो देशभरातील कलाकारांना एकत्र आणतो आणि सर्व भाषांमधील महत्त्वाच्या कामांची दखल घेतो.'

'थलाईवी'ला कोणताही राष्ट्रीय पुरस्कार न मिळाल्याबद्दल मनातलं दुःख मांडताना कंगना म्हणाली, "माझ्या 'थलाईवी' चित्रपटाला कोणताही पुरस्कार न मिळाल्याने तुम्ही सर्वजण निराश आहात. मला पुरस्कार मिळो किंवा न मिळो, मी कृष्णाची सदैव ऋणी आहे. जे माझ्यावर मनापासून प्रेम करतात, माझे कौतुक करतात त्यांनीही माझ्या स्वभावाचे या वृत्तीचे कौतुक केले पाहिजे. कला व्यक्तिनिष्ठ आहे. आणि माझा विश्वास आहे की ज्युरींनी त्यांचे काम उत्तमरितीने पार पाडले. मी सर्वांना शुभेच्छा देतो. हरे कृष्णा.'

कंगनाला मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार

कंगना राणौतला यावेळी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नसला तरी याआधी चार वेळा तिने सन्मान मिळाला आहे. 2010 मध्ये कंगनाला 'फॅशन'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. 2015 मध्ये कंगनाला 'क्वीन'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 2016 मध्ये 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'साठी कंगनाला तिचा दुसरा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 2021 मध्ये कंगनाने 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तिसरा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला.

kangana ranaut on not getting national awards 2023 for her movie Thalaivii
Subhedar Review: गनीमावर रोखल्या नजरा, तलवारी भिडल्या "सुभेदारा"चा महाराजांना मानाचा मुजरा!

कंगनाचं वर्कफ्रंट

कंगना राणौतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती आगामी 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे. हा सिनेमा कंगनाने दिग्दर्शित केलाय

यामध्ये कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय कंगना रणौत 'तेजस' या चित्रपटातही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.