लग्नासाठी कंगनाची दिल्लीच्या मुलाला पसंती?डेटिंगचे किस्से सांगत केला उलगडा

कंगनानं 'धाकड' सिनेमाच्या प्रमोशनिमित्तानं दिलेल्या मुलाखतीत जुन्या दिवसांतील अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
Kangana Ranaut
Kangana RanautInstagram
Updated on

कंगना रनौतनं(Kangana ranaut) 'धाकड'(Dhaakad) सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत आपल्या स्ट्रगलच्या दिवसांविषयी संवाद साधला आहे. या मुलाखतीत मात्र ती दिल्लीमधील मुलांविषयी भरभरुन बोलली आहे. कंगना दिल्लीत राहत असताना दिल्लीतील मुलं तिचा खर्च भागवायचे असं ती म्हणाली आहे. अर्थात यामध्ये तिच्यासोबत तिच्या मेत्रिणीही होत्या असं देखील तिनं सांगितलंय. घरातून पळून सर्वात पहिल्यांदा ती दिल्लीत आली होती. तेव्हा तिच्या खिशात फक्त १० हजार रुपये होते. कंगनानं मुंबई आणि दिल्लीतील मुलांची तुलना करताना दिल्लीवाली मुलंच कशी चांगली आहेत याचे अनेक दाखले दिले.

Kangana Ranaut
RRR Hindi OTT Release Date: नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित, जाहिर केली तारीख

आज कंगना रनौत बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या आणि सिनेमासाठी तगडी फी घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामिल आहे. पण इथवर पोहोचण्याचा कंगनाचा प्रवास खूपच कठीण होता. वयाच्या १६ व्या वर्षी कंगनानं आपलं घर सोडलं आणि पळून मुंबईत आली होती. पण त्यापुढे तिला अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला होता. अगदी तिच्या खाण्यापिण्याचे वांदे होते असंदेखील ती मुलाखतीत म्हणाली होती.

Kangana Ranaut
'तारक मेहता' च्या चाहत्यांना मोठा झटका; मुख्य अभिनेत्याचा मालिकेला रामराम?

कंगना म्हणाली, ''दिल्लीमधला माझा अनुभव खूप वेगळा होता. आता दिल्लीत काय बदललं आहे याविषयी मला माहित नाही. पण जेव्हा मी राहत होते तेव्हा आम्ही ५-६ मुली होतो आणि आमच्या सगळ्यांचे मित्रदेखील होते. त्यांना आम्ही ड्रायव्हर बनवलं होतं अक्षरशः आमचं. ते आम्हाला फिरायला घेऊन जायचे,आमची हॉटेलची बिलंदेखील भरायचे. दिल्लीच्या मुलांची मी मनापासून प्रशंसा करतेय. दिल्लीतील मुलं आम्हाला खूप छान-छान ठिकाणी फिरायला न्यायची. जेव्हा मी कमवायला लागले तेव्हा मी पण त्यांना पैसे द्यायचे. पण आमची बिलं भरताना,आम्हाला फिरवताना दिल्लीच्या मुलांच्या तोंडावर जरा देखील कटकटीचा भाव नसायचा. ते मनापासून आमच्यासाठी सगळं करायचे''.

Kangana Ranaut
क्रिकेटचा 'गब्बर' सिनेमाच्या पडद्यावर; शिखर धवनचं बॉलीवूडमध्ये पदार्पण

कंगना रनौतनं पुढे मुंबईच्या मुलांसदर्भातही खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या. कंगना म्हणाली,''जेव्हा मी दिल्लीतून मुंबईत आले तेव्हा दोन्हीकडच्या राहणीमानात खूप फरक होता. ज्यामुळे सुरुवातील मला अनेक धक्के बसले. मुंबईतील मुलं आणि दिल्लीतील मुलांमध्ये खूप फरक आहे''. कंगनाच्या मते जर तुम्हाला मुंबई स्थित मुलासोबत डेटला जायचं असेल तर तुम्हाला बिल शेअर करावं लागतं.

कंगना रनौत म्हणाली,''माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं आणि शॉकिंगही होतं. जेव्हा मी चंदिगढला होते तेव्हा मी कोणालाही डेट करताना कधी स्वतः पैसे भरले नाहीत. पण मुंबईत प्रत्येकजण इतका प्रॅक्टिकल आहे की तुम्ही डेटवर जरी गेलात तरी बिल शेअर करावं लागतं. पाणी प्यायलो तरी त्या बॉटलचे पैसे देखील शेअर करावे लागतात. पण मला वाटतं की हे सुद्धा योग्यच आहे. कूल आहे. त्यात चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही''.

Kangana Ranaut
माधुरी- अनिल कपूरच्या आयकॉनिक 'तेजाब'चा रीमेक; जाणून घ्या याविषयी

कंगना रनौत अजूनही स्वतःला 'सिंगल' असल्याचंच म्हणत आहे. पण आदित्य पांचोलीपासून अध्ययन सुमन ते अगदी आपल्या हृतिक रोशन पर्यंत सर्वांसोबत तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कंगनानं सांगितलं होतं की तिचं लग्न जमत नाही कारण तिच्याविषयी पसरलेल्या अफवा त्यात अडचण आणत आहेत. ती मुलांना मारते अशी चुकीची अफवा आपल्याबद्दल पसरवली आहे असं कंगना म्हणाली होती.

Kangana Ranaut
Cannes 2022: गोल्डन-ब्लॅक साडीत हॉट दीपिकावर उपस्थितांच्या नजरा खिळल्या...

कंगनाच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर ती लवकरच 'धाकड' सिनेमात Action करताना दिसणार आहे. हा सिनेमा २० मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात दिव्या दत्ता,अर्जुन रामपाल देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमाला रजनीश घईनं दिग्दर्शित केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.