Kangana Ranaut: 'जर का मला...' राजकारणात येण्यावर कंगनानं दिली मोठी प्रतिक्रिया!

तू राजकारणात येणार का? असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला होता. त्यावर तिनं दिलेलं उत्तर चर्चेचा विषय आहे.
Kangana Ranaut Interview
Kangana Ranaut Interview esakal
Updated on

Kangana Ranaut Interview : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया अन् वक्तव्यांसाठी चर्चेत असते. त्यावरुन तिला अनेकदा ट्रोलही (Latest Entetainment News) व्हावे लागले आहे.मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम राहून तिनं अनेकांची नाराजीही ओढावून घेतल्याचे दिसून आले आहे.

कंगनानं यापूर्वी देखील तिच्या राजकीय प्रवेशाविषयी वक्तव्यं केली आहे. (Kangana Ranaut Latest News) आता एका मुलाखतीमध्ये तिला पुन्हा त्यावरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नावर तिनं दिलेलं उत्तर तिच्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे. कंगना राजकारणातील प्रवेशाविषयी काय म्हणाली हे आपण जाणून घेणार आहोत.

सध्या कंगनाचा भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या आयुष्यावर आधारित इमर्जन्सी(emergency actress Kangana) नावाच्या चित्रपटाची चर्चा आहे. त्यात तिनं इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. जून महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या निमित्तानं तिनं दिलेल्या एका मुलाखतीतलं ते वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे.

कंगनाला त्या मुलाखतीमध्ये तुला देशाचा प्रधानमंत्री व्हायला आवडेल का असा प्रश्न विचारण्यात आला होता.त्यावर तिनं दिलेलं उत्तर हे चर्चेत आहे. (Kangana Interview) कंगनाच्या त्या चित्रपटातील इंदिरा गांधी यांच्या भूमिकेतील लूक पाहून तिचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं होतं. त्यानंतर या चित्रपटाचे चाहत्यांना वेध लागले आहेत.

राजकारणात तर यायचंय पण... (Kangana Entry In politics)

कंगना म्हणते, कला हा एक व्यवसाय आहे. कलाकारांवर सरस्वती देवीची कृपा असते. तुम्हाला माहिती आहे की, आपण राजकारणाकडे कोणत्या नजरेनं पाहतो. त्या जगात जाण्याची माझी काही इच्छा नाही. मला त्याचा भागही व्हायचं नाही. मी कलाकार आहे आणि मला तेच काम करायला आवडेल.

मला जर देशाची सेवा करण्याची एखादी संधी मिळाली तर मी नक्कीच राजकारणात जाईल. देशाला माझी गरज असल्यास मी त्या पर्यायाचा नक्की विचार करेल. असेही कंगनानं तिच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे. अमर उजालानं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

Kangana Ranaut Interview
Kangana Ranaut: "मला कोणतीही भूमिका देऊ नका अन्यथा..."; अॅनिमलच्या दिग्दर्शकाला कंगना थेटच म्हणाली, पण नेमकं कारण काय?

खरं तर कंगनाची ही प्रतिक्रिया तिच्याच एका जुन्या वक्तव्यावरुन आली आहे. तिनं पूर्वी असं म्हटलं होतं की, मला एक राजकीय व्यक्ती व्हायचं आहे. पण याबाबत लोकांना माझ्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. त्यांचा जो निर्णय असेल तो मला मान्य करावा लागेल. असे कंगनानं म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.