Kangana Ranaut On pathaan: शाहरुख खानचा 'पठाण' मोठा गाजावाजा करत २५ जानेवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सिनेमाविषयी चाहत्यांमध्ये भलतीच क्रेझ पहायला मिळत आहे. देशातच नाही तर परदेशातही शाहरुख खानच्या या अॅक्शन सिनेमाला पहायला सिनेमागृहात गर्दी झालेली दिसतेय. आता तर कंगना रनौतनं देखील शाहरुख खानच्या पठाणवर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. (Kangana Ranaut reaction on 'Pathaan' Bollywood Movie)
कंगनाचा आगामी सिनेमा 'इमरजन्सी'चं शूट संपल्या त्यानिमित्तानं एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या पार्टीतच अभिनेत्रीनं शाहरुखच्या 'पठाण' संदर्भात बातचीत केली.
कंगनानं शाहरुखच्या या सिनेमाचं कौतूक करताना, ''पठाण बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. असे सिनेमे चालायला हवेत. मला वाटतं की आपले हिंदी सिनेमावाले अजूनही चाचपडत आहेत. प्रत्येकाला आपल्या पातळीवर प्रयत्नपूर्वक चांगले सिनेमे बनवायला हवेत''.
याच कंगनाच्या पार्टीत अनुपम खेर यांनी देखील 'पठाण' विषयी बोलताना हा बिग बजेट सिनेमा आहे असं आवर्जुन सांगितलं. पठाण सिनेमाचं बजेट जवळपास २५० करोडचं आहे.
'पठाण' रिलीज आधी वादात सापडलाच होता पण रिलीज झाल्यावरही काही ठिकाणी सिनेमाविरोधात प्रदर्शनं झाली. एकीकडे जिथे शाहरुखचे चाहते पठाणचं समर्थन करत आहेत तिथे दुसरीकडे काही लोक सिनेमाला बॉयकॉट करताना दिसत आहेत.
पण असं असलं तरी सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगपासून ते फर्स्ट डे कलेक्शनपर्यंत साऱ्याच कमाईच्या आकड्यांनी हैराण करुन सोडलं आहे. बोललं जात आहे की या सिनेमानं पहिल्या दिवशी तब्बल ५१ करोडची कमाई केली आहे.
शाहरुख खाननं २०१८ नंतर तब्बल ४ वर्षांनी कमबॅक केलं आहे. सिनेमा मोठ्या पडद्यावर २५ जानेवारीला रिलीज झाला. आणि सिनेमाला चांगला मोठा वीकेंड मिळाला आहे. त्यामुळे बॉक्सऑफिसवरील 'पठाण'च्या कमाईच्या आशा पल्लवीत झाल्यात.
सिनेमाच्या बिझनेस एक्स्पर्टचं म्हणणं आहे की,सिनेमा पहिल्या आठवड्यात जवळपास २०० करोड पर्यंत मजल मारु शकतो. तर पहिल्या आठवड्याची वर्ल्डवाइड कमाई किमान ३०० करोड असू शकते.
पठाण देशभरातील तब्बल ५५०० स्क्रीन्सवर रिलीज झाला होता आणि आता जवळपास तो आकडा वाढत ८००० स्क्रीन्स सिनेमाला वर्ल्ड वाइड मिळाल्या आहेत. या सिनेमाला घेऊन एक्सपर्ट जो अंदाज लावताना दिसत होते त्याहून अधिक सिनेमाच्या पहिल्या दिवसाची कमाई झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.