PM Modi Garba Song: "वाह! किती सुंदर..."पीएम मोदींनी लिहिलेल्या गरबा गाण्याची कंगना झाली फॅन!

Kangana Ranaut Reacted On PM Modi Garba Song
Kangana Ranaut Reacted On PM Modi Garba Song
Updated on

Kangana Ranaut Reacted On PM Modi Garba Song: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले गरबा गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. वास्ते आणि लेजा रे यांसारख्या लोकप्रिय गाणे गाणारी गायिका ध्वनी भानुशालीने हे गाणे गायिले आहे.

हे गाणे चित्रपट निर्माता जॅकी भगनानी यांच्या डायनॅमिक म्युझिक लेबल जस्ट म्युझिकने रिलीज केले आहे. सध्या हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या गाण्याला काही तासातच लाखो व्ह्यूज मिळाले आहे. नेटकऱ्यांसोबतच बॉलीवूडमधील स्टार्स यांनीही या गाण्याचे कौतुक केले आहे.

Kangana Ranaut Reacted On PM Modi Garba Song
Ravindra Pipat : दिग्दर्शक रवींद्र पीपट यांचे निधन

आता त्यातच बॉलीवूडची पंगा क्विन कंगना रणौतने देखील पीएम नरेंद्र मोदींनी लिहिलेल्या या गाण्याचे कौतुक केले आहे. कंगनाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेयर केली आहे.

तिने तिच्या एक्स प्लॅटफॉर्मवर लिहिले की, "किती सुंदर आहे. अटलजींच्या कविता असो किंवा नरेंद्र मोदीजींची गाणी/कविता आणि कथा.. आपल्या नायकांना सौंदर्य आणि कलेत रमलेले पाहून हृदयाला आनंद होतो. #Navratri2023 गरबा सर्व कलाकारांसाठी खूप प्रेरणादायी असतो." आता कंगनाची x पोस्टही व्हायरल होत आहे. नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

Kangana Ranaut Reacted On PM Modi Garba Song
Khatron Ke Khiladi 13 Winner : डिनो जेम्स ठरला 'खतरों के खिलाडी 13' चा विजेता, ट्रॉफीसह मिळाले 'इतके' लाख

यापुर्वी गायिका ध्वनी भानुशालीने पीएम मोदींनी लिहिलेल्या गरबा गाण्याचा म्युझिक व्हिडिओ तिच्या एक्स अकाउंटवर शेअर करत पीएम मोदींचे आभार मानले होते.

यासोबत तिने लिहिले, 'प्रिय नरेंद्र मोदी जी, तनिष्क बागची आणि मला तुम्ही लिहिलेला गरबा खूप आवडला आणि आम्हाला नवीन लय असलेले गाणे बनवायचे होते. जे आम्ही तयार केले'

Kangana Ranaut Reacted On PM Modi Garba Song
India vs Pakistan: मॅचदरम्यान भर स्टेडियमध्ये अरजित सिंगने केलं अनुष्का शर्माचं फोटोशूट, व्हिडीओ व्हायरल

तर यावर पीएम मोदींनी पोस्ट शेयर करत टीमचे आभार मानले. ध्वनी भानुशालीच्या पोस्टला प्रतिक्रिया देताना पीएम मोदींनी लिहिले की, 'ध्वनी भानुशाली, तनिष्क बागची आणि जस्ट म्युझिकच्या टीमचे आभार. मी वर्षांपूर्वी लिहिलेल्या गरब्याच्या गीताचे सुंदर सादरीकरणासाठी! अनेक आठवणींना उजाळा दिला. मी बर्‍याच वर्षांपासून लिहिले नाही, परंतु गेल्या काही दिवसात मी एक नवीन गरबा लिहू शकलो आहे, जो मी नवरात्रीच्या काळात शेअर करेन.

यंदा नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 24 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या 9 दिवसांमध्ये देवीचे स्मरण आणि पुजापाठ करुन गरबा खेळला जातो. गाण्याच्या टीझरमध्ये उत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये गरबा आणि नऊ देवींची पूजा करतानाचे सीन्स दाखवण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()