Subramanian Swamy on Kangana: "महिला फक्त सेक्ससाठी नाहीत तर...", कंगनाने सुब्रमण्यम स्वामींचे टोचले कान

कंगनाने दसऱ्याला केलेल्या रावणदहनावर सुब्रमण्यम स्वामींनी विरोध केलाय. त्यावर कंगनाने त्यांना सडेतोड उत्तर दिलंय
kangana ranaut reply on Subramanian Swamy that he oppose actress
kangana ranaut reply on Subramanian Swamy that he oppose actress SAKAL
Updated on

Subramanyam Swami on Kangana Ranaut News: २४ ऑक्टोबरला राजधानी दिल्लीत झालेल्या सर्वात मोठ्या लव कुश रामलीलामध्ये कंगना रणौत प्रमुख पाहुणी म्हणुन आली होती. इतकंच नाही तर कंगनाने या कार्यक्रमात रावण दहन करुन तब्बल 50 वर्षांचा इतिहास मोडला. याच गोष्टीवर सुब्रमण्यम स्वामींनी बोट ठेवुन कंगनावर टिका केलीय.

(kangana ranaut reply on Subramanian Swamy that he oppose actress)

kangana ranaut reply on Subramanian Swamy that he oppose actress
Kartik Aaryan In Pune : कार्तिक आर्यन पुण्यातल्या दगडुशेठच्या चरणी! फोटो व्हायरल

सुब्रमण्यम स्वामी कंगनाला म्हणाले

सुब्रमण्यम स्वामींनी कंगनाचा बिकीनी मधला फोटो शेअर केलाय. आणि हा फोटो शेअर करुन कंगना लिहिते, "रामलीलाच्या शेवटच्या दिवशी कंगनाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेने पाचारण केले. पण ही गोष्ट मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्याबद्दल आदरयुक्त नाही."

कंगनाचं सुब्रमण्यम स्वामींना सडेतोड उत्तर

कंगनाने सुब्रमण्यम स्वामींना उत्तर देताना लिहीलंय की, "स्विमसूट पिक्चर आणि तुमच्या निरागस बोलण्यातुन तुम्ही असं सुचवत आहात की, राजकारणात मार्ग काढण्यासाठी माझ्या शरीराशिवाय माझ्याकडे देण्यासारखे दुसरे काहीही नाही.

हा मी एक कलाकार आहे. पण जर माझ्याऐवजी हिंदी चित्रपटांमधील सर्वकालीन महान लेखक, दिग्दर्शक, निर्माता, क्रांतिकारी उजव्या विचारसरणीचा प्रभावशाली एखादा तरुण पुरुष जो कदाचित भविष्यातील एक उत्तम नेता जो मार्गदर्शनासाठी पात्र असेल तर राजकारणात येण्यासाठी तो कदाचित आपले शरीर विकत असेल असे तुम्ही म्हणू शकाल का?"

स्त्री फक्त शरिराची गरज भागवण्यासाठी नाही तर...

कंगना उत्तर देताना पुढे म्हणाली, "खोलवर रुजलेली लैंगिकता आणि स्त्री शरीराची सुप्त लालसा तुम्हाला विकृत बनवते. स्त्रिया केवळ सेक्ससाठी नसतात, त्यांच्याकडे इतर अवयव असतात जसे की मेंदू, हृदय, हात, पाय आणि इतर सर्व काही जे पुरुषाकडे असते किंवा एक महान नेता होण्यासाठी आवश्यक असते . मग श्री सुब्रमण्यम का नाही?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.