Kangana Ranaut: भाजप समर्थक आहे म्हणून? कंगणाच्या बिल्किस बानोवरील चित्रपटाला जिओ देत नाहीय परवानगी!

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने बिल्किस बानो प्रकरणावर चित्रपट तयार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Kangana Ranaut
Kangana RanautEsakal
Updated on

Kangana Ranaut Armed With Bilkis Bano Movie Script: सध्या जगभरात बिल्कीस बानो प्रकरण चर्चेत आहे. बिल्कीस बानो प्रकरणातील दोषीची शिक्षा गुजरात सरकारने रद्द केली, त्यासंदर्भात काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत गुजरात सरकारचा निर्णय रद्द केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी मोठा निकाल देत ११ दोषींची सुटका नाकारली आहे. आता एकीकडे या प्रकरणाची चर्चा असताना आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने बिल्किस बानो प्रकरणावर चित्रपट तयार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Kangana Ranaut
Abhijit Bichukle : 'अटल सेतू' ऐवजी 'राजमाता जिजाऊ' यांचे नाव द्या! शेवडी-न्हावाशेवा सागरी सेतुसाठी बिचुकलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बिल्किस बानो प्रकरणात सोमवारी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बिल्किस बानो प्रकरणाला वेगळे वळण मिळाले तर त्यानंतर कंगना रणौतने तिच्या अधिकृत X अकाऊंटवर या प्रकरणाबाबत ट्विट केले आहे.

कंगनाच्या एका चाहत्यानं तिला विचारले की, 'कंगना, तू नेहमी महिलांच्या हक्कांबद्दल बोलतेस. महिलांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी काम करते. मला तुला हे विचारायचे आहे की, तुला 'बिल्किस बानो'वर चित्रपट बनवायचा आहे का? स्त्रीवादासाठी नाही, एक स्त्री म्हणून तुला तिची कथा जगासमोर आणायला आवडेल का?'

Kangana Ranaut
Ranbir Kapoor : 'अ‍ॅनिमल' च्या वादावर रणबीर कपूरनं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, 'तुम्हाला जर...', काय म्हणाला तो?

कंगना राणौतने देखील या चाहत्यांच्या ट्विटवर उत्तर देताना लिहिले की, 'मला 'बिल्कीस बानो'वर चित्रपट बनवायचा आहे आणि गेल्या तीन वर्षांपासून या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहे. त्याबाबत मी संशोधन करत आहे. यासाठी मी सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मशी संपर्क साधला, मात्र प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या कारणाने चित्रपटाला नकार दिला.'

Kangana Ranaut
Bigg Boss 17: फायनल राहिली बाजूला, त्यापूर्वीच समोर आले विजेत्याचे नाव! कोण आहे टॉप ३ स्पर्धक

'नेटफ्लिक्स' आणि 'अमेझॉन प्राइम' व्यतिरिक्त तिने 'जिओ सिनेमा'लाही स्क्रिप्ट दाखवली होती. 'नेटफ्लिक्स' आणि 'अॅमेझॉन प्राइम' हा चित्रपट राजकीय हेतूने प्रेरित वाटतो आणि त्यांना राजकीय विषयांवर चित्रपट बनवण्यास मनाई असल्याचे सांगत नकार दिला तर 'जिओ सिनेमा'ने कंगना भाजपला पाठिंबा देते, त्यामुळे जिओ सिनेमा तिच्यासोबत काम करणार नसल्याच सांगितले असं तिने या ट्विटमध्ये लिहिले आहे.

2002 च्या दंगलीत बिल्किस बानोवर 11 जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यादरम्यान बिल्किस बानोही 5 महिन्यांची गरोदर असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, नंतर दोषींना जन्मठेपेची शिक्षाही झाली. आता कंगना राणौत या गंभीर विषयावर चित्रपट बनवणार की नाही आता हे लवकरच कळेल.

कंगना राणौतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 'तेजस' चित्रपटात दिसली होती. आता कंगना 'इमर्जन्सी' चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.