Kangana Ranaut
 Kantara Movie
Kangana Ranaut Kantara Movieeskal

Kangana Ranaut: पुढच्या वर्षी ‘कांतारा’ ऑस्करसाठी पाठण्यात यावा; कंगनाची मागणी

कंगणाने केले ‘कांतारा’चे तोंड भरुन कौतुक...
Published on

सध्या चित्रपटसृष्टीत दाक्षिणात्य चित्रपटांचं वर्चस्व पहायला मिळत आहे. मग तो ‘पुष्पा’ असो किंवा ‘के.जी.एफ’ जवळपास सर्वच चित्रपटांची जादु पसरली आहे. त्यातच कांतारा या चित्रपटाने सर्वांनाच वेड केलं आहे.अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा कांतारा चित्रपटसृष्टीत त्याच्या कथाकथनाच्या प्रभावी शैलीने आणि थीमने खुपच गाजत आहे आणि अनेक रेकॉर्ड बनवत आहे.

Kangana Ranaut
 Kantara Movie
Karan kundra: असं काय केलं करणने की नेटकऱ्यांनी त्यांची लाजच काढली?

शिल्पा शेट्टी कुंद्रा, मधुर भांडारकर, धनुष , राणा दग्गुबती, किच्चा सुदीप यांच्यासोबतच देशभरातील सेलिब्रिटींकडून या चित्रपटाची भरभरुन प्रशंसा होत आहे. आता बॉलिवूडची क्विंन  अभिनेत्री कंगना राणावतनेही हा चित्रपट पाहिला आणि त्यांनतर ती स्वत:ला या चित्रपटाची प्रशंसा करण्यापासून रोखू शकली नाही.

कंगनाने तिच्या एक व्हिडिओ अपलोड केला आहे, जिथे ती म्हणाली, ‘मी कांतारा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या कुटुंबासह परत येत आहे आणि मी अजूनही थरथरत आहे. किती थरकाप उडवणारा अनुभव!.ऋषभ शेट्टी तुम्हाला सलाम. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, कृती, तल्लख! अविश्वसनीय! लोककथा, परंपरा, देशी समस्या यांचा किती सुरेख संगम आहे. फोटोग्राफी, अॅक्शन, थ्रिलर अगदी सुरेख.’

Kangana Ranaut
 Kantara Movie
Thank God: पॅन्ट शर्टातील श्रीकृष्ण चालतो मग सूटाबुटातील चित्रगृप्त का नाही ?

या व्हिडिओनतंर तिने इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली आहे. ज्यात तिनं पुढील वर्षी ‘कांतारा’ला भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्याची विनंती केली आहे.यात तिनं लिहिलयं “कांतारा हा पुढील वर्षी ऑस्करसाठी भारताकडून जाणारा चित्रपट असावा. अजून हे वर्षं संपायचं आहे, आणखीनही काही उत्तम चित्रपट येतील, पण सध्या केवळ ऑस्करपेक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं योग्य चित्र उभं राहणं गरजेचं आहे. आपला देश म्हणजे रहस्यं आणि जादुई गोष्टींनी समृद्ध अशी भूमी आहे. कांतारा हा चित्रपट साऱ्या जगाने अनुभवायला हवा.” या स्टोरीलात तिने दिग्दर्शक, अभिनेता रिषभ शेट्टीलाही टॅग केलं आहे. रिषभने तिची स्टोरी शेअर करत तिचे आभार मानले आहे.

Kangana Ranaut
 Kantara Movie
Kangana Ranautची राजकारणात एन्ट्री? हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

'कांतारा' हा चित्रपट फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता मात्र चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर, तो डब करून हिंदी, तेलगू, तमिळ आणि मल्याळममध्येही प्रदर्शित केले गेले. याचित्रपटाने जगभरात 170 कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्यात 150 कोटींहून अधिक कमाई भारतात झाली आहे. ‘कांतारा’ आतापर्यंतचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट बनला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()