Kangana Ranaut: 'इंग्रजी येत नाही म्हणणाऱ्यांनो, मी आंतरराष्ट्रीय शिखर संमेलनात!'

तुम्हाला खलनायक बनविणाऱ्यांना तुम्ही 'कॉमेडियन' बनवा! असं कंगनानं त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Kangana Ranaut news
Kangana Ranaut news esakal
Updated on

Bollywood Actress Kangana Ranaut: बॉलीवूडची क्वीन म्हणून लोकप्रिय असलेल्या कंगनाचा एक दिवस शांततेत जात नाही. ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. देशाच्या सामाजिक, राजकीय (Bollywood Trending News) परिस्थितीवर प्रभावीपणे भाष्य करणारी सेलिब्रेटी म्हणून कंगनाला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी देशाच्या स्वातंत्र्याविषयी कंगनानं केलेल्य़ा वक्तव्यानं सोशल मीडियावर खळबळ उडवून (Social Media Viral News) दिली होती. देशातील विविध राज्यांमध्ये तिच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. तिच्यावर सोशल मीडियावरुन नेहमी होणारी टीका यामुळे कंगनानं आता एक पोस्ट शेयर केली आहे.

कंगनानं आपल्या पोस्टमधून टीका करणाऱ्यांना धारेवर धरले आहे. एका जुन्या मुलाखतीची क्लिप तिनं सोशल केली आहे. जेव्हा आपला संघर्षाचा काळ सुरु होता तेव्हा कुणीही बोलत होते. आपल्याला वेगवेगळे सल्ले देत होते. ज्यांना तुम्ही आदर्श मानता तेही अशावेळी कशाप्रकारे तोंड फिरवतात हे मी अनुभवले. एवढं सगळं होत असताना खचले मात्र नाही. आपण यशस्वी होणार ही जिद्द मनात कायम होती. मला ज्यांनी अपमानित केले त्या सगळ्यांना मी माझ्या कामातून उत्तर दिले होते. आज मी एका वेगळ्या उंचीवर आहे याचा मला अभिमान आहे. कामातून सगळ्यांना जे काही सांगायचे आहे ते सांगितले आहे. असं कंगनानं म्हटले आहे.

Kangana post
Kangana post esakal

तुमचा स्वतावर विश्वास असेल तर काहीही बिघडत नाही. लोकांचं तुमच्याविषयचं मत हे नेहमीच बदलत असते. तेव्हा त्याचा फारसा विचार काही करु नका. तुम्ही तुमच्या अधिकाराविषयी कधीही वाट पाहू नका. त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवा. माझ्या करिअरच्या सुरुवातीला इंग्रजी येत नाही म्हणून अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. माझा अपमानही झाला होता. आज मी एका आंतरराष्ट्रीय शिखर संमेलनात आहे. याची आठवण कंगनान करुन दिली आहे.

Kangana Ranaut news
Genelia Video: 'रितेश तुझं आता खरं नाही! का म्हणतेय जेनेलिया असं?'

आपण आपला प्रवास करायचा. तुमच्यावर झालेल्या अन्याय, अत्याचार याचे भांडवल करुन त्याच्यावरुन सहानुभूती मिळवण्याचा माझा विचार नाही. मला ते आवडतही नाही. लोकांच्या दृष्टीनं स्वताला पाहण्याचा प्रयत्न करु नका. त्याचा काही फायदा होणार नाही. आपल्याला काय वाटते हे महत्वाचे आहे. जे कुणी टीका करतात त्याचा स्वताच्या प्रगतीसाठी विचार करायला शिका. असे कंगनान त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा त्या अपमानाचा बदला घेण्याची संधी तुम्हाला मिळेलच. असे कंगना म्हणते.

Kangana Ranaut news
Aamir Khan: बॉलीवूडचे चित्रपट 'फ्लॉप' का होतात? आमिरनं कबूल केलं की...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.