कंगना रनौतच्या(Kangana ranaut) 'धाकड'(Dhaakad) सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. या ट्रेलर रीलिजच्या निमित्तानं अभिनेत्रीनं मीडियाशी बातचीत करताना अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं आहे. दोन दिवसांपूर्वी साऊथचा अभिनेता किच्चा सुदीपनं आपल्या मुलाखतीत म्हटलं होतं की हिंदी राष्ट्रीय भाषा नाही. यावर अजय देवगणनं प्रतिक्रिया देताना ट्वीट केलं होतं. त्यानं लिहिलं होतं,''हिंदी आपली मातृभाषा आणि राष्ट्रीय भाषा आहे आणि कायम राहील''. मग काय यानंतर संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीतून या दोघांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटल्या,ज्यांना वादाचा रंग चढला. साऊथच्या सिनेमांची तुलना बॉलीवूडच्या हिंदी सिनेमांशी होऊ लागली. अद्याप हा वाद थांबण्याचं काही नाव घेत नाही. 'धाकड' ट्रेलर रिलीजच्या निमित्तानं कंगनानं या मुद्द्यावर आपलं मत मांडलं आहे.
कंगना रनौतने म्हटलं आहे की,''कन्नड,तामिळपासून गुजराती,हिंदी या सगळ्या भाषा संस्कृत भाषेपासून आल्या आहेत. मग संस्कृतला मागे ढकलून आपण हिंदीला काय राष्ट्रीय भाषा बनवत आहोत,याचं उत्तर माझ्याकडे नाही. हे त्या-त्या वेळेला घेतले गेलेले निर्णय आहेत. जेव्हा खलिस्तान म्हणतं की आम्ही हिंदीला मानत नाही,तरुण मुलांच्या मनात यावरनं चुकीच्या समजूती पेरल्या जात आहेत. हे लोकं संविधानचा अपमान करीत आहेत. तामिळ लोकांना वेगळा देश हवा आहे. बंगाल रीपब्लिकची मागणी होते आणि म्हणतात आम्ही हिंदीला भाषा नाही समजत. तर मग अशा वेळेला तुम्ही हिंदीला मनाई करत नाही आहात,तर दिल्लीमध्ये केंद्रिय शासनच नाही असं म्हणत आहात. याच्याशी खुप सारे मुद्दे जोडेले गेलेले आहेत''.
कंगनानं शेवटी म्हटलं आहे की,''जेव्हा तुम्ही हिंदी भाषेचा अपमान करता तेव्हा तुम्ही संविधानचा अपमान करता. दिल्ली सरकार कोणतंही काम हे हिंदी भाषेतूनच करते. जेव्हा आपण दुसऱ्या भाषेच्या लोकांशी बोलतो तेव्हा हिंदी भाषेतून बोलतो. कारण एकमेकांना भाषा कळायला हवी. खरंतर हिंदी ,तामिळ,संस्कृत या भाषांना फक्त एकदुसऱ्यांचं म्हणणं समजून घेण्याचं माध्यम बनवलं पाहिजे. हे आपल्यालाच ठरवायला हवं. आता पाहिलं तर सध्या संविधानमध्ये हिंदीच राष्ट्रीय भाषा आहे असं म्हटलं आहे. तर मग जे अजय देवगणनं म्हटलं आहे की,हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे तर मग ते चुकीचं कसं झालं. जर कुणी म्हटलं की कन्नड,तामिळ,हिंदी भाषा खूप जुन्या आहेत तर ते चुकीचं नाही. जर माझ्या हातात असेल तर मी संस्कृत भाषेला कायद्यानं राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित करेन. आपण का संस्कृत भाषेला राष्ट्रीय भाषा करु शकत नाही. शाळांमधून का नाही संस्कृत भाषेला अनिवार्य केलं जात, हे मला अजूनही कळलं नाही''.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.