Kangana Ranaut: 'अब की बार फिरसे...', 2024 च्या निवडणुकीबाबत कंगणाचं भाकित! नेटकऱ्यांची चर्चा..

कंगना रनौत गेल्या दिवशी हरिद्वारमध्ये स्पॉट झाली होती. यावेळी अभिनेत्री पूर्णपणे धार्मिक दिसली.तिने गंगा आरतीही केली. तिने 2024 च्या लोकसभा निवडणुकीबद्दलही सांगितले.
Kangana Ranaut
Kangana Ranaut Esakal
Updated on

कंगना रणौत हे मनोरंजन विश्वातलं असं नाव आहे जे कायम चर्चेत असतं. कंगना ही नेहमीच अनेक विषयावर तिचं परखड मत व्यक्त करत असते. मग ते राजकारण असो किंवा मनोरजंन विश्व तिची चर्चा तर होतेच. ती तिच्या पोस्ट आणि ट्विटवरुन अनेकांवर निशाणा साधत असते.

Kangana Ranaut
Maharashtra Din: किती जणांना मारून टाकण्यात आले? महाराष्ट्र दिनी केतकी चितळेच्या पोस्टची चर्चा

दरम्यान तिच एक वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं. सध्या कंगना तिचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी'च्या रिलीजच्या तयारीत व्यस्त आहे. याच दरम्यान अभिनेत्री रविवारी हरिद्वारला पोहोचली. यावेळी तिने काली मंदिरात जाऊन गंगा आरती केली. तिने तिथे जावुन पुजापाठही केला मात्र या भेटीदरम्यान तिनं आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली.

2024 च्या लोकसभा निवडणुकीबद्दल कंगना जेव्हा विचारणा करण्यात आली त्यावेळी ती म्हणली की, कंगना म्हणाली, 'निवडणुकीबद्दल लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे, पण 2024 मध्येही तेच घडेल जे 2019 मध्ये झाले होतं.' 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) 353 जागा जिंकल्या आणि सत्तेत परतले.

Kangana Ranaut
Milind Gawali: 'कपड्यांना किती महत्व द्यायचं..', मिलिंद गवळी जळगावकरांविषयी स्पष्टच बोलले

कंगनाबद्दल बोलायचं झालं तर ती राजकारणातही तितकीच सक्रिय दिसते. ती अनेक राजकिय मुद्यावर भाष्य करत असते. देशपातळीवर घडणाऱ्या अनेक घडामोडींवर ती पोस्ट करत असते. काही दिवसांपुर्वी ती आगामी निवडणूक लढवणार असल्याची चर्चानांही उधाण आले होते.

Kangana Ranaut
PS 2 Box Office: ऐश्वर्या रायच्या 'पोनियिन सेल्वन 2' ची गरुड झेप! 3 दिवसातच पार केला इतक्या कोटींचा टप्पा

कंगनाने 2006 मध्ये 'गँगस्टर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कंगणाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कंगना लवकरच चंद्रमुखी 2 मध्ये दिसणार आहे. ब्लॉकबस्टर हिट तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट चंद्रमुखीचा हा पुढचा भाग असेल. कंगनाने नुकतेच 'इमर्जन्सी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.



सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.