बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही गेल्या काही दिवसांपासून 'तेजस' या सिनेमासाठी चर्चेत होती. कंगना या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कसलीच कमी ठेवली आहे. कंगनाचा 'तेजस' हा सिनेमा शुक्रवार 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. कंगनाचे चाहते बऱ्याच दिवसांपासून या सिनेमाची प्रतिक्षा करत होते.
या चित्रपटात कंगना ही वेगळ्या रुपात दिसली. 'तेजस' या चित्रपटात कंगनाने वायुसेनेच्या पायलट तेजस गिलची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तेजस पायलट चालवताना दिसत आहे. तिने पाकिस्तानी दहशतवाद्यांविरुद्धच्या युद्धाची कहानी या चित्रपटात सांगितली आहे.
आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलिज झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांसोबत समिक्षकांचाही संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. आता हा सिनेमा रिलिज झाल्यानंतर कंगनाच्या चाहत्यांना या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणुन घेण्याची उत्सुकता आहे.
SACNILC च्या अहवालानुसार, तेजसने पहिल्या दिवशी फक्त 1.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कंगनाच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई केली नसली तरी वीकेंडला चित्रपटाची कमाई वाढण्याची शक्यता आहे. कंगनाचा तेजस भारतात 1300 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.
तेजस चित्रपटाचे दिग्दर्शन सर्वेश मेवाडा यांनी केले आहे. या चित्रपटात कंगना राणौतसोबत अंशुल चौहान, वरुण मित्रा, आशिष विद्यार्थी आणि विशाख नायर महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
यासोबतच बॉक्स ऑफिसवर आणखी दोन सिनेमे रिलिज झाले आहेत ज्यात 'सजनी शिंदे का वायरल वीडियो' आणि '12वी फेल' हे सिनेमे आहेत.
राधिका मदान आणि निम्रत कौर यांचा चित्रपट 'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' हा एक क्राइम थ्रिलर चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 15 लाखांची कमाई केली आहे.
तर विक्रांत मॅसीचा '12 वी फेल' हा चित्रपटाने पहिल्या दिवशी 1 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे तिनही सिनेमे काही खास कमाई करु शकलेले नाही मात्र विकेंडला हे सिनेमे काय कमाल करतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.