कंगनाच्या 'धाकड' चे शो कॅन्सल, कार्तिकच्या 'भूलभूलैय्या 2' ने केलं गारद

कंगनाचा 'धाकड' सिनेमा २० मे रोजी प्रदर्शित झाला होता. पण त्याला प्रदर्शनानंतर म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.
Kangana Ranaut’s ‘Dhaakad’ shows cancelled
Kangana Ranaut’s ‘Dhaakad’ shows cancelled Google
Updated on

कंगना रनौतचा(Kangana Ranaut) 'धाकड'(Dhaakad) आणि (Kartik Aaryan)कार्तिक आर्यन-कियारा अडवाणीचा 'भूलभूलैय्या २' बॉक्सऑफिसवर(Boxoffice) २० मे रोजी एकमेकांसमोर उभे ठकले अन् पूर्ण गणितच चुकलं. यामध्ये बाजी मात्र मारुन गेला कार्तिक आर्यनचा हॉरर कॉमेडी असलेला 'भूलभूलैय्या २', कंगनाचा अॅक्शन थ्रीलर सिनेमा मात्र चांगलाच तोंडावर पडला. आता बातमी कानावर पडतेय की कंगनाच्या 'धाकड' सिनेमाला खूप कमी प्रतिसाद मिळत असल्यानं त्याचे शो काही ठिकाणी चक्क कॅन्सल करण्यात आले आहेत.(kangana Ranaut 'Dhaakad' Movie Show Cancelled)

Kangana Ranaut’s ‘Dhaakad’ shows cancelled
'जगातली सगळ्यात अनोखी हेअर स्टाईल पाहिलीत का?'अनुपम खेर यांचा Video व्हायरल

यासंदर्भात अधिक माहिती देताना G7 मल्टिप्लेक्स आणि मराठा मंदिर सिनेमाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मनोज देसाई यांनी सांगितलं आहे की,''अनेक थिएटर्सनी 'धाकड' सिनेमाचे शो कॅन्सल केले आहेत,पण अद्याप आम्ही तसा निर्णय घेतलेला नाही. अर्थात गरज पडली तर विचार करून आम्ही देखील कंगनाच्या 'धाकड' सिनेमाचे शो कॅन्सल करू शकतो. हो,पण आम्ही ९०० सीटऐवजी आता 'धाकड' ३०० सीट असलेल्या जेमिनी थिएटरमध्ये शिफ्ट केला आहे. उलट 'KGF2' आम्ही पुन्हा ९०० सीटच्या गॅलॅक्सी थिएटरमध्ये लावला आहे. काही प्रेक्षक सिनेमा पहायला येत आहेत,त्यामुळे शो कॅन्सल करण्याचा निर्णय घेतला नसला तरी कमी सीट च्या जेमिनी थिएटरमध्ये तो शिफ्ट करावा लागला आहे.

Kangana Ranaut’s ‘Dhaakad’ shows cancelled
दगडु-प्राजक्ताचा 'टाइमपास 3' लवकरच; हृता दुर्गुळे दिसणार दबंग अंदाजात

दुसरीकडे 'भूलभूलैय्या २' ची मात्र बॉक्सऑफिस वर चांगली कमाई करण्यास सुरुवात झाली आहे. प्रदर्शनानंतर पहिल्या चार दिवसांत 'भूलभूलैय्या २' ने ६५ करोडचा बिझनेस केला आहे. तर 'धाकड' सिनेमाला मात्र २ करोडपर्यंत पोहोचायला मोठी कसरत करावी लागली आहे. धाकडची पहिल्या चार दिवसांतील कमाई फक्त १.८५ करोड इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.