कंगना दिसली नवाजुद्दीन सिद्दीकीच्या नवीन बंगल्यावर, काय होते भेटीचे कारण?

मंगळवारी संध्याकाळी कंगना रनौत नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुंबईतील नवीन घरी पोहोचली - त्याचा नवीन बंगला, ज्याला त्याने नवाब असे नाव दिले आहे.
कंगना दिसली नवाजुद्दीन सिद्दीकीच्या नवीन बंगल्यावर, काय होते भेटीचे कारण?
Updated on

मंगळवारी, नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddhin Siddiqui) कंगना रनौतचे मुंबईतील त्याच्या नवीन घरी स्वागत केले - तिच्यासोबत अवनीत कौर होती. कंगना नवाजुद्दीनच्या आगामी 'टिकू वेड्स शेरू' (Tiku Weds Sheru) या चित्रपटाची निर्माती आहे, ज्यामध्ये अवनीत (Avneet Kaur) त्याची सहकलाकार आहे. पापाराझीसाठी पोज देताना, कंगना तिची व्हिक्टरी साईन फ्लॅश करत म्हणाली, "टिकू वेड्स शेरू."

कंगना (Kangana Ranaut), तिच्या साड्यांच्या प्रेमासाठी ओळखली जाते. यावेळी तिने पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये, मोत्याचा हार आणि चमकदार लाल ओठांनी तिचा लूक ऍक्सेसरीझ केला. टिकू वेड्स शेरूचे सहकलाकार अवनीत आणि नवाजुद्दीन यांनी ब्लॅक कलरचे आऊटफिट्स घातले आहेत.

Tiku Weds Sheru set
Tiku Weds Sheru set

बुधवारी सकाळी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर कंगनाने नवाजुद्दीनचे त्याच्या घरी टिकू वेड्स शेरूची टीम होस्ट केल्याबद्दल आभार मानले. "सर, सुंदर संध्याकाळबद्दल धन्यवाद," तिने लिहिले.

नवाजुद्दीनने त्याचे दिवंगत वडील नवाबुद्दीन सिद्दीकी (Nawabuddhin Siddiqui) यांच्या स्मरणार्थ आपल्या बंगल्याचे नाव नवाब (Nawab) ठेवले आहे. अभिनेत्याने वैयक्तिकरित्या घराच्या कामामध्ये लक्ष घातले, जे पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे लागली. आपल्या स्वप्नातील घर तयार करण्यासाठी त्यांनी इंटिरियर डिझायनिंगची भूमिका घेतली. नवाजुद्दीनच्या बंगल्याचे सार उत्तर प्रदेशातील त्याच्या मूळ गाव बुढाना येथील घरातून प्रेरित असल्याचे सांगितले जाते.

बंगल्यात प्रवेश करण्यासाठी एक उंच कमान आहे, जी पारंपारिक लाकडी दारे आणि खिडक्यांसह बनले. बंगल्यात एक विस्तीर्ण लॉन देखील आहे, ज्याचा एक स्निपेट नवाजुद्दीनने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.