Kantara Kannada Movie: कांतारा सध्याच्या घडीला चर्चेत आलेला चित्रपट आहे. बॉलीवूडच्या चित्रपटांना या चित्रपटानं जोरदार दणका दिला आहे. त्याच्यामुळे अजय देवगणचा थँक गॉड, अक्षय कुमारचा रामसेतू यांची पिछेहाट झाल्याचे दिसून आले आहे. कांतारानं तब्बल पावणेदोनशे कोटींची कमाई केली आहे. हे सगळं होत असताना त्यावरुन वादालाही सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर तर कांतारावर कौतूकाचा वर्षाव सुरु आहे. त्याची स्टोरीलाईन, कलाकार, बॅकग्राउंड म्युझिक, कॅमेरा याविषयी भरभरुन बोलले जात आहे.
कन्नड भाषेतील कांतारा गेल्या महिन्यात साऊथमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता तो हिंदीत प्रदर्शित झाला आहे. बॉलीवूडच्या प्रेक्षकांना देखील तो कमालीचा आवडला आहे. कन्नड सरकारचा देखील या चित्रपटावर मोठा प्रभाव असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी हा चित्रपट पाहून एक धोरणात्मक निर्णयही घेतला आहे. साठ वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण केलेल्या देवाच्या नर्तकांना महिना दोन हजार रुपयांचा मासिक भत्ता दिला जाणार आहे. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे कांतारामध्ये जी भूत कोला नावाची जी परंपरा दाखविण्य़ात आली आहे. त्याचे अनेक संदर्भ हिंदू धर्मात सापडतात. असे सांगितले जाते.
नर्तक देव आणि भूत कोलाची परंपरा -
मुळात कांतारा पाहताना त्याची कथा, त्या कथेमागील सामाजिक, धार्मिक, राजकीय पार्श्वभूमी समजून घेणं जास्त महत्वाच ठरणार आहे. याचे कारण चित्रपट भलेही तांत्रिकदृष्ट्या प्रेक्षकांना आकर्षित करुन घेईल. मात्र त्याची कथा धार्मिक, सांस्कृतिक अंगानं जोपर्यत समजत नाही तोपर्यत कांतारा हा अनेकांना नीरस वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कर्नाटकच्या एका ग्रामीण भागामध्ये भूतकोला नावाची एक प्रथा आहे. कांतारामध्ये ती दाखवण्यात आली आहे. त्यावरुन आता वाद सुरु झाला आहे.
कर्नाटकातील एका गावामध्ये भूत कोलाची परंपरा अजुनही पाळली जाते. गावातील लोकं अशा व्यक्तीची पुजा करतात ज्या व्यक्तीच्या अंगात देव संचारतो. असे म्हटले जाते. देवासारखी वेषभूषा करुन ती व्यक्ती उपस्थित लोकांशी सातत्यानं संवाद साधत असते. अशावेळी लोकं तिच्या पायाही पडतात. अनेकांना चित्रपटांमधील ते दृष्य खटकले. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा हा प्रसंग आहे. अशी टीकाही त्यांनी केली आहे.
देवाची वेशभूषा केलेली व्यक्ती नाचू लागते. नाचता नाचता काही वेळानं तिच्या अंगात देव संचारतो. देवच तिच्या रुपानं सगळ्यांशी बोलू लागतो. असे गावकरी मानतात. आपल्या अडीअडचणी, वेगवेगळे प्रश्न त्या देवाला विचारतात. तो त्यांना मार्गही सांगतो. तो जे सांगेल तो देवाचा आदेश मानला जातो.. कांतारा हा अशाच कथेवर आधारलेला चित्रपट आहे.
होमबेल प्रॉडक्शनच्या वतीनं या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून त्याचे दिग्दर्शन हे ऋषभ शेट्टीनं केलं आहे. त्यामध्ये त्यानं मुख्य भूमिका देखील केली आहे. या चित्रपटानं अवघ्या वीस दिवसांत पावणे दोनशे कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे कांतारा हा जास्त चर्चेत आला आहे. त्याच्याकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील कांतारा हा तिसरा असा चित्रपट आहे ज्यानं सर्वाधिक कमाई केली आहे. पहिल्या दोनमध्ये केजीएफचा समावेश आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.