Kapil Sharma Show: 'द कपिल शर्मा शो' मध्ये राज बब्बर आपली तीन मुलं प्रतिक बब्बर,आर्य बब्बर,जुही बब्बर यांच्यासोबत गेले होते. कपिलच्या शो मधील या एपिसोडचे बरेच प्रोमो समोर आले आहेत ज्यात राजबब्बर आपल्या मुलांसोबत हास्यविनोद करताना दिसत आहेत.
याच शो मध्ये राजब्बर यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आपल्याविषयी लोकांमध्ये खूप गैरसमजुती पसरल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले,''लोकांना वाटतं आता राजकारणात आहेत राजबब्बर यांना पैशाची काही कमी नसेल पण प्रत्यक्ष आयुष्यात असं माझ्यासोबत काहीच झालं नाहीय''.(Kapil Sharma Show raj babbar on joining politics said na ghar ka na ghat ka)
सोनी टीव्हीनं त्यांच्या सोशल मीडियावर राजबब्बर यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. आणि त्याला कॅप्शन दिलं आहे की,'कप्पूचे प्रश्न समोर आणणार राजब्बर यांच्या आयुष्यातील रोमांचक किस्से'.
व्हिडीओमध्ये कपिल शर्मा यांनी राज बब्बर यांना विचारलं की,''कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का कि प्रोड्युसरनं तुमचं मानधन दिलं नाही आणि राजकारणात गेल्यानंतर तो प्रोड्युसर तुम्हाला पैसे द्यायला आला?''
तेव्हा राज बब्बर म्हणाले, ''उलट झालंय..जेव्हापासून मी राजकारणात गेलो,समाजकारणात सक्रिय झालो तेव्हापासून ज्या प्रोड्युसरचे पैसे देणं बाकी होतं ते देणं पण त्यांनी बंद केलं''.
राज बब्बर पुढे म्हणाले,''प्रोड्युसर्सना वाटतं की राजजी आता राजकारणात गेलेयत त्यांना पैशाची काय गरज आहे. पण राजकारणाविषयी ही खूप चुकीची समजूत आहे लोकांमध्ये. लोकांना वाटतं की तुम्ही एकदा राजकारणात गेलात की १००-५०० करोडची प्रॉपर्टी तर जमतेच तुमच्या नावावर. पण माझं काय झालं..ना घर का ना घाट का...इथून मानधन मिळालं नाही आणि तिथे काही कमावलं नाही''.
माहितीसाठी फक्त इथे नमूद करतो की राज बब्बर हे कॉंग्रेस पार्टीचे सदस्य आहेत. त्यांनी ओटीटी वर नुकतंच पदार्पण केलं आहे. 'हॅप्पी फॅमिली-कंडिशन अप्लाय' या कॉमेडी शो मध्ये ते दिसणार आहेत. यामध्ये अतुल कुलकर्णी,रत्ना पाठक शाह,सनाह कपूर आणि आयेशा झुल्का यांनी देखील काम केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.