करण जोहरनं घातलाय उच्चशिक्षितांच्या लग्नाचा घाट, ट्रोलर्सचा हल्लाबोल

करण जोहरला IITIIMShaadi.com ने आपला ब्रॅंड अॅम्बेसिडर घोषित केलं आहे,त्यामुळे उलटसुलट चर्चा रंगलीय.
Karan Johar
Karan JoharGoogle
Updated on

लग्न जुळवणाऱ्या प्रसिद्ध साइटची जाहिरात केल्यामुळे निर्माता-दिग्दर्शक करण जोहर(Karan Johar) चांगलाच ट्रोल होतोय. करण जोहरला IITIIMShaadi.com ने आपला ब्रॅंड अॅम्बेसिडर घोषित केलं आहे. करारानुसार, येणाऱ्या काही महिन्यात कंपनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर करणच्या विवाहासंस्थेविषयकच्या जाहिरातीची एक सीरीज सुरु करणार आहे. पण जशी पहिली जाहिरात सोशल मीडियावर लॉन्च केली गेली तसं मोठ्या संख्येनं ट्रोलर्स करणवर तुटून पडले.

जाहिरातीत करणनं म्हटलं आहे,''लग्न जुळण्याचं एक असं ठिकाण,ज्याच्यासारखं दुसरं कुणीच नाही-IITIIMShaadi.com!आणि मी खऱ्या प्रेमाला आयुष्यात अनुभवण्यासाठी खूप उत्सुक आहे. पडद्यावर नाही,प्रत्यक्षात''. जर तुम्ही सुयोग्य जोडीदाराच्या शोधात आहात,तर http://www.iitiimshaadi.com/या साइटवर जा. तिथे तुमच्यासारखेच उच्च दर्जाचे विवाहइच्छुक विविध क्षेत्रातील सुशिक्षित स्थळं तुमची वाट पाहत आहेत''. करण जोहरच्या या जाहिरातीचा व्हिडीओ पोस्ट झाल्यावर नेटकऱ्यांनी टीका करणाऱ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. कुणी म्हटलंय,''हे छान आहे, म्हणजे IIt/IIm वाल्यांनी आपापसातच लग्न करायचं का?'' तर एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे,''तुझं स्वतःचं लग्न झालं नाहीय आणि तु दुसऱ्यांना लग्न करायचा सल्ला काय देतोयस. हास्यास्पद आहे हे सारं''. तर अशा आणखी करणला ट्रोल करणाऱ्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत.

Karan Johar
अमिताभ यांना रश्मिकाचं उलट उत्तर,'गूडबाय' च्या सेटवर घडला प्रकार

करण जोहर बऱ्याच दिवसांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करीत आहे. या सिनेमात रणवीर सिंग(Ranveer Singh),आलिया भट्ट(Alia Bhatt),शबाना आझमी,जया बच्चन,धर्मेंद्र अश तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. हा एक रोमॅंटिक कॉमेडी ड्रामा असणार आहे. सिनेमाला अजून प्रदर्शनासाठी अवकाश आहे. मात्र आता विवाहसंस्थेच्या साइटची जाहिरात केल्यानं करणला ट्रोल केलंय त्यावर तो काय प्रतिक्रिया देतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लाऊन राहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.