Viral Video: एका जुन्या व्हिडीओवरनं करण जोहरला लोक चांगलंच सुनावताना दिसत आहेत. या व्हिडीओ क्लीपमध्ये करण जोहर राखी सावंतला असे काही प्रश्न विचारताना दिसत आहे जे लोकांना मुळीच आवडलेलं नाही. हा व्हिडीओ करण जोहरच्या प्रसिद्ध 'कॉफी विथ करण' च्या सीझन २ चा आहे. ज्यावेळी गेस्ट म्हणून शो मध्ये राखी सावंतला बोलावलं गेलं होतं.
करण जोहर आणि राखी सावंतच्या संवादाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये करण जोहरच्या प्रश्नांचे उत्तर देताना राखी सावंत दिसत आहे. ती म्हणतेय, ''माझा चेहरा इतका चांगला नव्हता. माझी बॉडी देखील आकर्षक नव्हती''.
त्यानंतर करण लगेचच तिला विचारताना दिसतो की,''तर मग यासाठी तू काही केलंस का? मेहनत घेतलीस का? प्लास्टिक सर्जरी,तू हे सगळं केलंस का?''(Karan Johar is brutually trolled over an old video in which he is asking rakhi sawant about plastic surgery)
यावर बिनधास्त राखी सावंत उत्तर देताना दिसते,''माझे ओठ खूप छोटे होते,ते सिलिकॉननं नीट करण्यात आले आहेत''. करण मग म्हणाला,''सिलिकॉन वापरलं. ते सिलिकॉन आणखी कुठे कुठे वापरलं शरीरावर?''
त्यावर राखी उत्तर देत म्हणाली,''का नाही? जे देव देत नाही ते डॉक्टर देतात. मिस वर्ल्डपासून मिस युनिव्हर्सपर्यंत ते मोठ मोठ्या अभिनेत्रींपर्यंत हे सगळं करून घेतात मग राखी सावंतनं केलं तर कुठे बिघडलं?''
अर्थात या व्हिडीओत मोठ्या ईमानदारीनं उत्तर देणाऱ्या राखी सावंतची लोक प्रशंसा करताना दिसत आहेत. तर करण जोहरवर मात्र टीकेची झोड उठत आहे.
सोशल मीडियावर या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स लोक करताना दिसत आहेत. एकानं लिहिलं आहे की,'प्लास्टिक सर्जरीवर प्रश्न विचारुन करणला राखीचा अपमान करायचा होता. पण तिनं किती ग्रेसफुली हे स्विकारलं.'
आणखी एकानं सांगितलं की-'आता जान्हवी,अनन्या सारख्या अभिनेत्रींना हे असे प्रश्न विचारुन दाखव'. तर कुणीतरी लिहिलं आहे,' हाच प्रश्न जान्हवीला विचारायची हिम्मत कर.किंवा जा आणि मौनी रॉय,नोरा फतेहीला हा प्रश्न विचार'.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.