Karan Johar: करणचा ट्विटरला रामराम, नेटकरी म्हणे, 'आता तुझा शो बंद कर'!

सोशल मीडियावर नेहमीच लाईमलाईटमध्ये असणाऱ्या करणचा चाहतावर्ग मोठा आहे.
Karan Johar
Karan Joharesakal
Updated on

Karan Johar Twitter: बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी, निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. तो म्हणजे त्यानं सोशल मीडियावरुन घेतलेली एक्झिट. करण आता यापुढे टविट्वर दिसणार नाही. त्यानं ट्विटरला रामराम केला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. करण असा काही निर्णय घेईल असे कुणाला वाटले नव्हते.पण त्यानं ट्विटर अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सोशल मीडियावर नेहमीच लाईमलाईटमध्ये असणाऱ्या करणचा चाहतावर्ग मोठा आहे. इंस्टावर त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. करणनं ट्विटरला बाय बाय करण्यानं चाहत्यांनी त्याला वेगवेगळे प्रश्न विचारुन हैराण केले आहे. दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी त्याला बोल लावले आहेत. तू चांगले काम केले असून आता तू तुझा तो कॉफी विथ करण नावाचा शो बंद कर असा सल्ला त्याला दिला आहे. यामुळे करण आता नेटकऱ्यांचे ऐकणार की चाहत्यांसाठी तो शो सुरु ठेवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Karan Johar
Karan Joharesakal

ट्विटर सोडण्याची घोषणा केल्यानंतर करण एकदम लाईमलाईटमध्ये आला आहे. मात्र त्यानं असा निर्णय का घेतला हे काही कळायला मार्ग नाही. त्यानं आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला आणखी पॉझिटिव्ह एनर्जी हवी आहे. त्यामुळे मी एक नवे पाऊल टाकत आहे. त्यासाठी मी ट्विटरला गुडबाय करतो आहे. यानंतर त्यानं त्याचं ट्विटर अकाउंट बंद करुन टाकले आहे. करणच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Karan Johar
Viral: '30 दिवस 5 कैदयांसोबत...' 69 वर्षांनी समोर आलं त्या देशाचं सत्य!

कित्येकांनी करणला ट्रोल केले आहे. त्यात त्यांनी त्याला गंमतीशीर कमेंट केल्या आहेत. करण तू तुझा शो पहिला बंद कर. आता तो आम्हाला नकोसा झाला आहे. असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.