जगातील सर्व नात्यांपेक्षा आई-वडिलांचं नातं प्रत्येकासाठी खास असतं. जगण्यासाठी आई भावनिक दृष्टिकोन देते, तर वडील आयुष्याकडे प्रॅक्टिकली कसं पाहायचं ते शिकवतात. म्हणूनच 'मदर्स डे'सोबतच 'फादर्स डे'सुद्धा Father's Day जगभरात तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो. या दिनानिमित्त बॉलिवूडमधील 'सिंगल फादर्स' कोण आहेत, ते पाहुयात.. अभिनेता तुषार कपूर, राहुल देव यांनी 'सिंगल फादर' होण्याचा निर्णय खूप आधी घेतला होता. यात नंतर निर्माता, दिग्दर्शक करण जोहरची भर पडली. (Karan Johar Tusshar Kapoor and more Celebrating Bollywoods single dads on Fathers Day)
करण जोहर- मे २०१७ मध्ये करणने यश आणि रुही या दोघांचा पिता झाल्याचं घोषित केलं. यश आणि रुही हे जुळे असून सरोगसीद्वारे त्यांचा जन्म झाला. करणने पिता होण्याविषयी त्याच्या पुस्तकात लिहिलं होतं, 'मला पालक व्हायचं आहे. हे कसं शक्य होईल मला माहित नाही, पण मला वडील होण्याचा अनुभव घ्यायचा आहे. माझ्या मुलांवर मी प्रेमाचा वर्षाव करेन.' यश आणि रुही चार वर्षांचे झाले असून त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
तुषार कपूर- अभिनेता तुषार कपूरनेही सरोगसीद्वारे त्याच्या आयुष्यात लक्ष्य या मुलाचं स्वागत केलं. २०१६ मध्ये लक्ष्यचा जन्म झाला असून तो आता पाच वर्षांचा आहे. 'माझ्या आयुष्यात लक्ष्यचं येणं हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण आहे. मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही इतका आनंदी आहे', असं त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हटलं होतं.
संदिप सोपारकर- कोरिओग्राफर संदिप सोपारकरने २००७ साली दोन वर्षीय अर्जुनला दत्तक घेतलं होतं. गर्लफ्रेंड आणि मॉडेल जेसी रंधावाशी लग्न करण्यापूर्वी खूप आधी त्याने 'सिंगल फादर' होण्याचा निर्णय घेतला होता.
राहुल देव- अभिनेता राहुल देवने कोणत्याही मुलाला दत्तक घेतलं नाही, पण पत्नी रिनाच्या निधनानंतर मुलगा सिद्धांतचं संगोपत तो एकटा करतोय. २००९ मध्ये कॅन्सरने रिनाचं निधन झालं होतं. सिद्धांत आता १९ वर्षांचा आहे. राहुलने आई आणि वडील दोघांची भूमिका पार पाडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.