करण जोहर(Karan Johar) हा नेहमीच काही ना काही कारणानं वाद ओढवून घेत असतो. थोडक्यात शहाणपण पाजळायला जातो अनं कोणा नं कोणाच्या टीकेला फुकटचा बळी पडतो. खरंतर सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर तर त्याला जरा जास्तच धारेवर धरलं जातं. इतकं की कधी कधी खरंच त्याची दया येते. नेपोटिझमसाठी बॉलीवूडमध्ये सर्वस्वी कारणीभूत त्यालाच ठरवले जाते. काही दिवसांपूर्वीच त्यानं बॉलीवूड पार्टी त्याच्या घरी आयोजित केली होती तेव्हा करिना कपूर,अमृता अरोरा यांच्यासोबत अनेकांची नाव कोरोनाबाधितांमध्ये समोर आली होती आणि काय पुन्हा करणला टार्गेट करण्यात आलं होतं. पण एवढं करूनही जो शांत बसेल तो करण कुठला.
आता त्याचं झालं असं की वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक राज्याचे सरकार आता नवीन निर्बंध लागू करीत आहेत. त्यात आता दिल्ली सरकारनेही दिल्लीतील वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता मल्टिप्लेक्स,सिंगल थिएटर्स २८ डिसेंबरपासून पुन्हा बंद करण्याचा नियम लागू केला. तेव्हा करण जोहरनं आपल्या ट्वीटर अकाऊंटवरनं एक ट्वीट करीत म्हटलं की,''दिल्ली सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी हा नियम लागू करू नये. आपला निर्णय सरकारने बदलावा. कारण मल्टिप्लेक्समध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेची जास्त काळजी घेतली जाते. तिथे कोरोना पसरण्याची शक्यता ना के बराबर आहे.'' करणने असे ट्वीट केल्याने मात्र त्याला ट्रोलर्सनी चांगलंच फैलावर घेतलं आहे. काही ट्रोलर्सनी म्हटलंय,''तुझे अर्थहीन सिनेमे बघण्यासाठी सिनेमागृहात येऊन आम्हाला कोरोना फुकटचा विकत घ्यायचा नाही. तुला पैसे मिळतील आणि आम्हाला कोरोना होईल त्याचं काय.'' करण जोहरचे ट्वीट पुढे जोडले आहे,ते सविस्तर वाचा.
खरंतर,२२ ऑक्टोबर पासनं सिनेमागृह खुली करण्यात आली. त्यामुळे कोरोनामुळे डळमळीत झालेल्या मनोरंजन क्षेत्राला आशेचा किरण दिसला होता. बडे-बडे सिनेमे रीलीजसाठी तयार होते. काहिंनी रिस्क न घेता ओटीटीचाच पर्याय निवडला पण बड्या स्टार्सच्या बिग बजेट सिनेमांनी मात्र थिएटरमध्ये रीलीज होणं पसंद केलं. पण पुन्हा डिसेंबरच्या सुरुवातीपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वच राज्याच्या सरकारनी आवश्यकतेनुसार कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय केला. त्यामुळेच जर्सी,पृथ्वीराज सारख्या सिनेमांच्या निर्मात्यांनी लगोलग आपल्या रीलीज डेट पुढे ढकलल्या. अद्याप मुबंईत थिएटर्स खुली असली तरी अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारनं मात्र थिएटर्स बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं करण जोहर बिथरला अनं ट्वीट करून बसला ते आता त्याला महागात पडलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.