करण सूचकचे आमीरच्या पावलावर पाऊल ! 

karan suchak
karan suchak
Updated on

चांगले दिसायला कोणाला आवडत नाही ? विशेषतः कलाकारांसाठी, ज्यांना नेहमीच ऑनस्क्रीन चांगले दिसावे लागते. कोणतेही पात्र रंगविण्यासाठी आमीर खानची मेहनत आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळेच "मेरी हानिकारक बिवी' या मालिकेमध्ये अखिलेश पांडेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता करण सूचक याने त्याच्याच पावलावर पाऊल टाकायचे ठरवले आहे. नेहमीच्या भूमिकेला तडा देणाऱ्या "गजनी' आणि "दंगल'मधील पात्रासाठी आमीरने बनवलेल्या पिळदार शरीराप्रमाणेच, करणदेखील योग्य आहार आणि व्यायाम करून तसेच करत आहे. करण अखिलेश नावाच्या एका पिळदार शरीराच्या साधा; पण मजबूत मुलाची भूमिका साकारत आहे आणि त्या भूमिकेसाठी अशा शरीराची गरज आहे. करणने हे आव्हान म्हणून स्वीकारले आणि त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. 

रोज दोन तास व्यायाम करण्याव्यतिरिक्त करण काटेकोर आहार पाळत असून महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी त्याने मीठ आणि साखर बंद केले आहे. मालिकेतील करणचा लुक हा अतिशय सुंदर असून असे शरीर मिळविण्यासाठी त्याने घेतलेली मेहनत आणि गाळलेला घाम दिसून येत आहे. अशी वेळ एकदा आली होती की, जेव्हा त्याचे शरीर त्याला साथ देत नव्हते पण, त्याने धैर्याने हे नकारात्मक विचार झाडून टाकले आणि एकावेळी एक पाऊल अशा तऱ्हेने पुढे आला. 

करण म्हणाला, ""स्वतःसाठी चांगले काम करावे असे कोणाला वाटत नाही ? हे लक्षात ठेवूनच मी इथपर्यंत आलो आहे. जर तुम्ही तंदुरुस्त असाल तर काहीही करू शकता. तुमच्या क्षमतेला कोणत्याही मर्यादा येत नाहीत.'' 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.