Kareena Kapoor : 'आमच्या पिढीतले कलाकार जास्त मेहनती, आताचे फक्त....!' करिना कपूरनं नव्या सेलिब्रेटींचे टोचले कान

बॉलीवूडमध्ये बेबो म्हणून लोकप्रिय असणाऱ्या करिनाची गोष्टच वेगळी आहे.
Kareena Kapoor praised Rani Mukerji and Tabu
Kareena Kapoor praised Rani Mukerji and Tabuesakal
Updated on

Kareena Kapoor praised Rani Mukerji and Tabu : बॉलीवूडमध्ये बेबो म्हणून लोकप्रिय असणाऱ्या करिनाची गोष्टच वेगळी आहे. तिनं अभिनयानं एक वेगळे स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केले आहे. करिनानं आता ओटीटीवर डेब्यू केलं असून त्याची चर्चा होत आहे. याशिवाय तिनं नवी पिढी आणि जुनी पिढीतील कलाकार यांच्याविषयी केलेलं वक्तव्य लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

करिनानं त्या मुलाखतीमध्ये तब्बू आणि राणी मुखर्जी यांचे कौतुक केले आहे. या दोन्ही अभिनेत्रींनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. इंडियन फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात प्रतिभाशाली अभिनेत्री म्हणून राणी आणि तब्बूकडे पाहिले जाते. असेही तिनं म्हटलं. तर नव्या कलाकारांच्या तुलनेत जुन्या कलाकार हे अधिक मेहनती असल्याची प्रतिक्रिया तिनं यावेळी दिली.

नव्या कलाकारांविषयी काय बोलली करिना...

तब्बूविषयी बोलताना करिना म्हणाली की, तब्बू ही भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या वयाविषयी कुणीही कधीही प्रश्न विचारत नाही. ती केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन कसे करता येईल याचा विचार करत असते. शेवटी आमची बांधिलकी ही प्रेक्षकांचे मनोरंजन कसे करता येईल याच्याशी असते. तिथं तुमचे वय महत्वाचे नाही तर भूमिका जास्त महत्वाची ठरते.

यावेळी करिनानं सध्याच्या पिढीतील नव्या दमाच्या कलाकारांविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. करिना म्हणते, मी आता जे काही बोलणार आहे त्याविषयी माफी मागते. पण मला एक सांगायचे आहे की, अजुनही आमच्या काळातील अभिनेते नव्या कलाकारांपेक्षा चांगले काम करत आहेत.

मला माझं वय काय विचारता?

करिनाला जेव्हा तिच्या वयावरुन प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिला काहीसा राग आला. दरवेळी मला वयावरुन प्रश्न का विचारता. वय हा केवळ आकडा आहे. तुमचा स्क्रिनवर परफॉर्मन्स कसा आहे हे जास्त महत्वाचे आहे. लोकांचे तुम्ही कशाप्रकारे मनोरंजन करता हे पाहिले जाते. तुम्ही आमच्या अगोदरच्या पिढीला त्यांच्या वयावरुन कधी प्रश्न विचारत नाही. मग आम्हालाच का...असा सवालही करिनानं यावेळी उपस्थित केला.

करिनच्या प्रोजेक्टविषयी बोलायचे झाल्यास, ती प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या क्राईम थ्रिलर द बकिंगहॅम मर्डर्समध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती एक निर्माती म्हणून देखील सहभागी झाली आहे. तसेच तिच्याकडे द क्रु नावाचा चित्रपट असून त्यात ती तब्बू आणि क्रिती सेनन यांच्यासोबत स्क्रिन शेयर करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.