Kareena Kapoor: करिना कपूर खान ही इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय पहायला मिळते. तिथे ती नेहमीच आपले छान-छान फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसते. आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याविषयी ती इन्स्टावर नेहमीच अपडेट देत असते. पण जेव्हा तिला प्रश्न विचारला गेला की सोशल मीडियाच्या एका प्लॅटफॉर्मवर ती इतकी सक्रिय असताना दुसरीकडे तिचं साधं अकाऊंटही का नाही? आता हा प्रश्न विचारला गेला तो करिना ट्वीटरवर का नाही याविषयी. पण उत्तर म्हणून तिच्याकडे कारणांची लांबलचक लिस्टच होती.(Kareena Kapoor Khan reveals why she is not on Twitter)
आता काही दिवसांपासून करिनाचा लाल सिंग चड्ढा सिनेमा ट्वीटरवर भलताच ट्रेन्ड आहे. अर्थातच तिथे त्याच्या विरोधात सूर काढताना बायकॉटची मागणी केली गेली आहे. करिनानं जेव्हा या बॉयकॉट विषयावर प्रतिक्रिया दिली होती,तेव्हा ती खूपच उद्धट सुरात बोलली असं म्हणत ट्वीटरवर तिला ट्रोल केलं होतं. त्यामुळे जेव्हा तिला या ट्वीटरवरील बॉयकॉट ट्रेन्ड विषयी विचारलं,तिला केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगविषयी विचारलं तेव्हा ती म्हणाली,''मला या सगळ्यासाठी वेळ नाही''.
ती म्हणाली, ''मी नेहमी ऐकत असते,वाचत असते की कसं दर एक दिवसाआड किंवा अगदी नेहमीच इथं सेलिब्रिटींना ट्रोल केलं जातं. म्हणूनच मी ट्वीटरवर नाही. मला वाटतं हे प्लॅटफॉर्म अशा लोकांसाठी आहे,ज्यांना फक्त दुसऱ्यांच्या गोष्टीत रस असतो,त्याच्यावर बोलायचं असतं,अशा लोकांकडे भरपूर वेळ असतो, जेा माझ्याकडे मुळीच नाही. मला माझं स्वतःचं काम आहे,माझी मुलं आहेत,माझं कुटुंब आहे, आणि मला माझा अधिक वेळ माझ्या मुलांसोबत घालवायला आवडतो''.
करिना आमिरच्या लाल सिंग चड्ढा सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ती एका मुलाखतीत म्हणाली होती, ''हॉलीवूडचा फॉरेस्ट गम्प सिनेमा खूप क्लासिक सिनेमा आहे. पण ज्यांना इंग्रजी भाषा समजत नाही त्यांनी त्या कथेतील प्रेमाचा ओलावा अनुभवण्यासाठी लाल सिंग चड्ढा नक्की पहा. लाल सिंग चड्ढा हा सिनेमा तामिळ आणि तेलुगु मध्ये देखील डब करण्यात आला आहे. म्हणजे प्रत्येकाला हा सिनेमा आपल्या स्वतःच्या भाषेत पाहता येईल. आणि यात गैर काय आहे. कारण प्रत्येकानं फॉरेस्ट गम्प पाहिला असेल किवं पाहतील हे शक्य होणार नाही''.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.