करिनाचे अजब डोहाळे; सैफ झाला होता चकीत!

दुसऱ्यांदा गरोदर असताना कोणत्या पदार्थांचे डोहाळे लागले होते, हे करिनाने या मुलाखतीत सांगितलं.
Kareena Kapoor Khan, Saif Ali Khan
Kareena Kapoor Khan, Saif Ali KhanInstagram
Updated on

अभिनेत्री करिना कपूर खानने दुसऱ्या बाळंतपणानंतर पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात केली आहे. करिना लवकरच 'स्टार व्हर्सेस फूड' या शोमध्ये झळकणार आहे. या शोमध्ये ती प्रसिद्ध शेफसोबत विविध पदार्थ बनवणार आहे. हा शो सुरू होण्यापूर्वी करिनाने प्रसिद्धीसाठी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने पती सैफ अली खान, मुलगा तैमुर यांच्या सवयींबद्दल, गरोदरपणातील तिच्या डोहाळ्यांबद्दल, खान कुटुंबीयांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल सांगितलं. तैमुर आणि सैफला किचनमध्ये विविध पदार्थ बनवण्याची फार आवड आहे, असं करिना म्हणाली. सैफ तैमुरसोबत किचनमध्ये असताना करिनाला गाणी लावण्याचं काम दिलं जातं, असंही तिने सांगितलं.

"तैमुर आणि सैफला विविध पदार्थ बनवायला फार आवडतं. त्यांना किचनमध्ये पदार्थांसोबत विविध प्रयोग करायला आवडतात आणि त्यावेळी मला गाणी लावण्याचं काम दिलं जातं. दोघांनाही किचनमध्ये काम करताना जॅझ म्युझिक ऐकायला फार आवडतं", असं ती 'इंडियन एक्स्प्रेस' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. काही दिवसांपूर्वीच करिनाने तैमुरने बनवलेल्या कुकीजचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

हेही वाचा : अभिज्ञा भावे वेबसीरिजमध्ये

"मला वाटतं लॉकडाउनमध्ये सर्वचजण बनाना ब्रेड बनवत होते. मी ते कधीच नाही बनवलं, पण सैफचे किचनमध्ये विविध प्रयोग सुरूच होते", असं ती पुढे म्हणाली. यावेळी दुसऱ्या गरोदरपणात कोणत्या पदार्थांचे डोहाळे लागले होते, हेसुद्धा तिने सांगितलं. "मला त्यावेळी सतत पिझ्झा आणि पास्ता खावंसं वाटतं होतं. इटालियन पदार्थांचे डोहाळे मला लागले होते आणि ते पाहून सैफसुद्धा चकीत झाला होता", असं ती म्हणाली.

खान कुटुंबाच्या जेवणाच्या सवयीबद्दल तिने सांगितलं, "आम्ही जेव्हा जेव्हा जेवायला बसतो, तेव्हा एका जुन्या इटालियन कुटुंबात असल्यासारखं मला वाटतं. डायनिंग टेबलवर एक वेगळाच आनंद, उत्साह असतो. आम्ही सर्वचजण खाण्याचे शौकीन आहोत." करिनाच्या या आगामी शोचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या शोमध्ये करिना पिझ्झासुद्धा बनवणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()