3 Idiots Sequel: 2009 मध्ये आलेला आमिर खान, शर्मन जोशी आणि आर माधवन यांच्या तिकडीचा '3 इडियट्स' हा चित्रपट कुणीही विसरु शकत नाही. हा चित्रपट प्रत्येकाने किमान दोन ते तिन वेळा नक्कीच पाहिला असणार. या चित्रपटाची क्रेझ अजूनही तितकिच आहे.
राजकुमार हिरानी यांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता अनेक चित्रपटांचे सिक्वेल तयार होतं आहे. अशातच काही दिवसांपुर्वी आमिर खान, शर्मन जोशी आणि आर माधवन यांचा एकत्र एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.
14 वर्षांनंतर पुन्हा ते एकत्र दिसले म्हणुन काही त्याच्यात काहीतरी शिजत असल्याच्या चर्चा सोशल मिडियावर रंगली होती. ही तिकडी पुन्हा चित्रपटाचा दुसरा भाग घेवुन येत तर नाही ना म्हणजेच ता या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा सुरू झाली आहे.
'3 इडियट्स'चा सिक्वेल येणार आहे. अशी माहीती खुद्द करीना कपूरने दिली आहे. करीना कपूरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला असून आमिर खान, शर्मन जोशी आणि आर माधवनने ती फिरायला गेली होती तेव्हा तिच्यापासून सर्वकाही लपवल असल्याचं ती या व्हिडिओत सांगत आहे. मात्र आता तिला हे गुपित कळलं आहे. ती लगेच फोन उचलते आणि बोमन इराणीला या रिपोर्ट्सबद्दल विचारते.
ती तक्रार करते की ती जेव्हा बाहेर होती तेव्हा त्यांनी सर्वांनी ही योजना आखली. आमिर, शर्मन आणि आर माधवन चित्रपटाविषयी पत्रकार परिषद घेत असतानाची तिनं एक व्हायरल क्लिप देखील पाहिली. करीना म्हणाली या तिघाचं एकत्र येणं हे नक्कीच काहीतरी होतयं. ते काही शर्मनच्या चित्रपटासाठी एकत्र आले नाही. मला वाटतं ते या चित्रपटाच्या सिक्वेल साठीच एकत्र आले आहे, पण हे तिघचं का? मी का नाही. माझ्या शिवाय त्यानंतर ती बोमन इराणी यांना फोन करुन याबद्दल विचारणार असल्याचं सांगते.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या चित्रपटाचे चाहते खुपच आंनदित झाले आहे. ते नक्कीच याची उत्सूकतेने वाट पाहत आहे. काही दिवसांपूर्वी राजकुमार हिरानी यांनी मीडियाशी बोलताना या बातमीला दुजोरा दिला होता की, ते 3 इडियट्सचा सिक्वेल बनवणार आहे.
फ्रँचायझीबाबत त्यांनी सांगितले होते की, लेखनाचे काम सुरू आहे. ते त्यांचे सहलेखक अभिजात जोशी यांच्यासोबत काम करत आहेत. मात्र, त्याच्या सीक्वलमध्ये कोणते कलाकार असतील, कथानक काय असेल आणि तो कधी रिलिज होईल. याबाबत दिग्दर्शकाने माहिती दिली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.