करिना कपूर(Kareena Kapoor) आणि सैफ अली खान(Saif Ali Khan) हे बॉलीवूडमधील एक हॅपनिंग कपल. आज दोघंही आपल्या संसारत खूश आहेत. लग्नानंतर छान दोन गोंडस मुलांचे आई-बाबाही झाले आहेत. २०१२ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. त्याआधी चार ते पाच वर्षे दोघे एकत्र होते. लीव्ह-इन मध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. करिना ही खरंतर सैफची दुसरी पत्नी. त्याआधी सैफने आपल्यापेक्षा जवळ-जवळ बारा वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंग हिच्याशी प्रेमविवाह केला होता. अमृता आणि सैफला सारा-इब्राहिम ही दोन मुलं. पण याचा परिणाम सैफनं करिनासोबतच्या वैवाहिक आयुष्यावर आजतागायत तरी होऊ दिलेला नाही. पण नुकत्याच एका मुलाखतीतनं करिना कपूरने एक अशी गोष्ट एका अभिनेत्याविषयी सांगितली आहे ज्यानं करिना-सैफचं लग्न होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले होते. कोण आहे तो अभिनेता?
हो,तो अभिनेता आहे बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार(Akshay Kumar). जो खरंतर करिनाची मोठी बहिण करिष्माचा खास मित्र आहे. इतकच नाही तर कपूर कुटुंबियांशीही त्याचं जवळचं नातं आहे. करिना म्हणाली,''२००८ मध्ये मी,सैफ आणि अक्षय एक सिनेमा करीत होतो,ज्याचं नाव होतं 'टशन'. त्या सेटवर कामाच्या निमित्ताने मी आणि सैफ पहिल्यांदा भेटलो होतो. अक्षयशी माझी चांगली मैत्री तेव्हाही होती. तेव्हा टशनच्या शुटिंगच्या निमित्तानं सैफ आणि मी एकमेकांसोबत वेळ घालवल्यामुळे खूप जवळ आलो. आम्हा दोघांना एकमेकांप्रती प्रेम वाटू लागलं. पण तेव्हाच अक्षयला आमच्यातील या नात्याविषयी सुगावा लागला अन् त्यानं सांगितलं,''सैफ करिनापासून लांब रहा.ती मुलगी खतरनाक आहे. तिच काय अख्खं कपूर कुटुंब खतरनाक आहे. मी त्यांना चांगलं ओळखतो''. तेव्हा सैफ म्हणाला,''हो,माहित आहे मला. पण मी सांभाळून घेईन''. आता हे सगळं करिनाने अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाच्याच शो मध्ये येऊन सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.