Akshay Kumar on Kargil Vijay Diwas: भारतीय सैन्याच्या शौर्यासाठी 26 जुलै 1999 चा दिवस हा शौर्यासाठी ओळखला जातो. त्यावर्षी आजच्या दिवशी भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याचा पराभव केला होता. हा पराभव सोप नव्हता. यासाठी अनेक भारतिय शूर सैनिकांना प्राणाची आहूती द्यावी लागली. त्याच्या हौतात्म्याचे स्मरण करून, 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.
कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा दिवस देशभरात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याने देखील शहिद झालेल्या जवानांच्या
धाडसी आठवण करुन दिली आहे. कारगिल युद्धातील वीरांना अक्षयने सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने पोस्ट शेअर करून जवानांच्या हौतात्म्याचे स्मरण केले.
अक्षय कुमारने कारगिल विजय दिवसानिमित्त सैनिकांचा एक फोटो सोशल मिडियावर शेयर केला आहे. त्यात ट्विट करत त्यांनी लिहिले की, "अंतःकरणात कृतज्ञता आणि ओठांवर प्रार्थना, कारगिल युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या आमच्या शूरवीरांचे स्मरण..तुझ्यामुळेच आम्ही जगतो."
अक्षयच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया देत जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. एकाने लिहिलयं की, 'कारगिल विजय दिनानिमित्त देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व योद्ध्यांना विनम्र अभिवादन'
तर दुसऱ्याने लिहिलयं, 'कारगिल युद्धातील अमर हुतात्म्यांना कारगिल विजय दिवसानिमित्त कोटी कोटी प्रणाम, ज्यांनी आपल्या अतुलनीय धैर्याने आणि शौर्याने भारत मातेची शान आणि तिरंगा उंचावला.'
अक्षय कुमारचं वर्कफ्रंट:
बॉलिवूड स्टार अक्षय कुमार चा ओह माय गॉड 2 येत्या 11 ऑगस्टला रिलिज होणार आहे. त्याबरोबरच तो Sourarai Pottru च्या हिंदी रिमेकमध्ये आणि टायगर श्रॉफसोबतचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट दिसेल.
आणखी तो 'हेरा फेरी 3' या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटातून तो मराठी चित्रपटातही एन्ट्री करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.