Karishma Kapoor : 'ना आम्हाला कुणी सल्ला देणारं होतं, ना कुणी....' करिश्माची सध्याच्या 'बॉलीवूड ट्रेंड'वर सणसणीत प्रतिक्रिया!

करिश्मा ही (Karishma Kapoor ) मोठ्या कालावधीनंतर मर्डर मुबारक नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार असून तिच्या भूमिकेची चर्चा आहे.
Karishma Kapoor News
Karishma Kapoor Newsesakal
Updated on

Murder Mubarak star Karisma Kapoor : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर पुन्हा एकदा कमबॅक करते आहे. ९० च्या दशकांतील प्रसिद्ध सेलिब्रेटी म्हणून जिचे नाव घेतले जायचे त्या करिश्माचा मर्डर मुबारक नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या निमित्तानं तिनं काही मुलाखतींमधून आपल्या वेळचं बॉलीवूड आणि सध्याचे त्यातील फरक स्पष्ट केला आहे.

गेल्या काही वर्षात बॉलीवूड कशाप्रकारे बदलत गेले, सध्याचे कलाकार, त्यांची स्टाईल, काम करण्याची पद्धत या सारख्या वेगवेगळ्या गोष्टींवर करिश्मानं मोकळेपणानं तिची मतं मांडली असून त्यामुळे ती चर्चेत आली आहे. आता खूप काही बदललं असून आम्ही आमचा आवाज ऐकून निर्णय घ्यायचो आता यंत्रणा बदलली आहे. असे करिश्माचे म्हणणे आहे.

पीआर टीम अन् हेअर स्टायलिस्ट शिवाय काम...

करिश्मानं त्या मुलाखतीमध्ये सध्याच्या बॉलीवूड ट्रेंडविषयी परखडपणे तिची मतं व्यक्त केली आहे. ती म्हणते, आता बॉलीवूड खूपच बदललं आहे. आमच्या काळी कोणत्याही प्रकारे पीआर टीम नव्हती. कोणता स्टायलिशही नव्हता. आम्ही स्वताच सगळे हँडल करत असू. रोज सेटवर जायचे, सगळ्यांशी संवाद साधायचा हे मात्र नित्यनेमानं करत असू. संवाद साधणे आणि त्यातून सगळ्यांशी नातं तयार करणे ही गोष्ट करत राहिलो.

आम्हाला कुणी सल्ला देणारंही नव्हतं. काय चूकीचं, काय बरोबर हे सांगणारं देखील कुणी नव्हतं. जे निर्णय घ्यायचे ते स्वता, आता तसे नाही. परिस्थिती खूप बदलली आहे. आम्ही जो चित्रपट करतो आहोत तो आमच्यासाठी चांगला आहे की वाईट हे सांगणारंही कुणी नव्हतं. आता प्रत्येक सेलिब्रेटीकडे त्याची पीआर टीम आहे. आमच्यावेळी फक्त काम कऱण्याची वेगळी पॅशन होती. ती आम्ही फॉलो केली. असं करिश्मा म्हणते.

Karishma Kapoor News
Oscar 2024 Nitin Desai : 'ऑस्कर' सोहळ्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना आदरांजली!

हिरो नं १ ने सारं काही बदलून गेलं....

करिश्मानं त्या मुलाखतीमध्ये तिच्या बॉलीवूड प्रवासातील वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिल्याचे दिसून आले. ती म्हणते मी कधीही खास विचार करुन बॉलीवूडमध्ये अमूक एखादं गाणं केलं नाही. जे समोर आले ते ध्येयानं आणि पूर्ण योगदान देत करायचे असा विचार आमचा होता. एक माहिती होतं आपण काम करत राहायचे. त्याचा फायदा आपल्याला होणार आहे.

मला वाटतं मी जेव्हा गोविंदासोबत हिरो नं १ केला तेव्हापासून माझ्या बॉलीवूड प्रवासामध्ये खूप मोठा बदल झाला. मी आता जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा हिरो नंबर १ किती वेगवेगळ्या प्रकारे माझ्या करिअरमध्ये संधी घेऊन आला हे दिसते. या चित्रपटानं माझा करिअरला वेगळं वळण मिळालं. त्यानंतर मी राजा हिंदूस्थानी आणि दिल तो पागल है सारख्या चित्रपटांमध्ये काम करु शकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.