Karnataka Election Result: 'अरे 42 रॅली काढूनही...'कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर अभिनेत्यानं उडवली मोदींची खिल्ली..ट्विट व्हायरल..

KRK On Karnataka Election Result:
KRK On Karnataka Election Result:Esakal
Updated on

KRK On Karnataka Election Result: कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे सध्या देशातील राजकिय वातावरण तापलं आहे. मात्र आता या निवडणुकीत कल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजपला काँग्रेसनं धोबीपछाड दिलं आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर मतमोजणी सुरू आहे. यात काँग्रेस आघाडीवर आहे. कर्नाटकात काँग्रेस प्रमुख पक्ष म्हणून उदयास येत असल्याचे ट्रेंडवरून स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या कलावरून काँग्रेसला १२८, भाजपला ६८ आणि जेडीएसला २२ जागा मिळू शकतात.

या निवडणुकीत काँग्रेस सरकारने प्रचंड मतांनी आपला विजय नोंदवला आहे. त्यातच हा निकाल भाजपसाठी खुपच निराशाजनक असून यातील काँग्रेसच्या विजयाचं श्रेय हे राहुल गांधींच्या पदयात्रा दौऱ्याला देण्यात येत आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूकांवरुन आता सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. त्यापैकी काही नेत्यांच्या प्रतिक्रिया या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं असून आता मनोरंजन विश्वातुनही स्वत:ला चित्रपट समीक्षक म्हणवणारा अभिनेता केआरके उर्फ ​​कमाल रशीद खानने आता कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले आहे.

त्यानं याविषयी एक ट्विट सोशल मिडियावर शेअर केले आहे. ज्यात त्याने काँग्रेसचं कौतुक करत बीजेपीवर निशाणा साधला आहे. त्याच्या या ट्विटची सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे.

त्याने कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचे संपूर्ण श्रेय राहुल गांधींना देऊन केआरकेने ट्विट करत नरेंद्र मोदींवर ताशेरे ओढले आहेत.

KRK On Karnataka Election Result:
Bhaurao Karhade Podcast : 'मराठी कलाकारांना संपवण्याचा प्रयत्न करु नका!'

कमाल रशीद खान यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ' राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये 22 सभा घेतल्या आणि त्यांचा विजयाचा स्ट्राइक रेट 68% आहे आणि हा इतर सर्व राजकारण्यांपेक्षा जास्त आहे. मोदीजींनी 42 रॅली केल्या आणि त्यांचा विजयाचा स्ट्राइक रेट फक्त 40% आहे. आज राहुल हे भारतीय जनतेचे सर्वात आवडते राजकारणी असल्याचा हा पुरावा आहे. #कर्नाटक निवडणूक.'

KRK On Karnataka Election Result:
Parineeti Raghav Wedding: राजकारण अन् मनोरंजन हे नातच जुनं! केवळ राघव- परिचं नव्हे तर 'हे' देखील आहेत लिस्टमध्ये..

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधानांनी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या होत्या. भाजपने ज्या प्रकारे बजरंग बली, मुस्लिम आरक्षण असे मुद्दे पुढे करून कर्नाटकचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला होता.

इतकच नाही तर द केरळ स्टोरीवरही भाष्य केलं होतं. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी भारतभर फिरुन भारत जोडो यात्रा काढली होती. ज्याला अनेकांनी पाठिंबा दिला होता. आता त्यामुळे काँग्रेसचा विजय हा भारतीय जनता पक्षासाठी मोठा धक्का असल्याच बोललं जात आहे.

KRK On Karnataka Election Result:
Adah Sharma: केरळ स्टोरीच्या अदा शर्मानं आलिया अन् कंगनालाही टाकलं मागे! केला नवा विक्रम

अभिनेता आणि कथित समिक्षक केआरके सोशल मीडियावर भलताच सक्रिय असलेला पहायला मिळतो. केआरकेच्या पोस्ट्स सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात. तो प्रत्येक मुद्द्यावर सोशल मीडियावर अतिशय स्पष्टपणे प्रतिक्रिया देतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()