कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा कोरोना; 'भूलभूलैय्या2' स्टाइलनं दिली माहिती

कोरोनाबाधित झाल्यामुळे आता कार्तिक आर्यन लवकरच होणाऱ्या 'आयफा २०२२' पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहणार नसल्याचं देखील वृत्त आहे.
Kartik Aaryan Contracts Covid-19 for the Second Time
Kartik Aaryan Contracts Covid-19 for the Second TimeGoogle
Updated on

'भूलभूलैय्या २' च्या यशानं सध्या कार्तिक आर्यन भलताच खूश आहे. यानिमित्तानं दिलेल्या मुलाखतींमधून तो अनेक विषयांवर अगदी दिलखुलास पण बिनधास्त बोलताना दिसत आहे. आता त्यानं आपल्या सोशल मीडियावर एक नवी पोस्ट टाकलीय ज्याला वाचून चाहत्यांच्या चेहऱ्यावर आपल्या लाडक्या अभिनेत्यासाठी चिंता ही दिसून येतेय अन् त्याच क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर हसूही उमटतंय. कार्तिकनं आपल्याला दुसऱ्यांदा कोरोना झाल्याचं सांगितलं आहे. आपल्या इनस्टाग्राम अकाऊंटवर कार्तिकनं ही माहिती दिली आहे. त्यानं लिहिलं आहे,''सगळं इतकं पॉझिटिव्ह चालू होतं,हे पाहून कोरोनाला देखीला राहावलं नाही...'' आणि या सोबत त्यानं स्माइली इमोजी पोस्ट केली आहे.

याआधी मार्च २०२२ मध्ये कार्तिक आर्यनला कोरोना(Corona) झाला होता.त्यावेळी त्यानं 'भूलभूलैय्या २' सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. त्याचे चाहतेही तो लवकर बरा व्हावा म्हणून सोशल मीडियावर त्याच्यासाठी प्रार्थना करताना दिसले होते. सध्या मात्र कार्तिक त्याच्या 'भूलभूलैय्या २' सिनेमाला मिळालेल्या यशामुळे भलताच खूश आहे. त्यामुळे आपल्याला दुसऱ्यांदा कोरोना झाल्याची बातमी देताना त्यानं ह्युमर वापरला आहे.

Kartik Aaryan Contracts Covid-19 for the Second Time
Exclusive: 'माझी होणारी 'सौ' अशीच हवी'; कार्तिकनं जाहिर केली गुणांची यादी

कार्तिक आर्यन आता कोरोनाबाधित झाल्यामुळे 'आयफा २०२२' मध्ये सहभागी होणार नसल्याचं देखील वृत्त समोर आलं आहे. कार्तिक आर्यन आता लवकरच आपल्याला 'शहजादा','कॅप्टन इंडिया' आणि 'फ्रेडी' सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमांविषयी कार्तिक आर्यनमध्ये खूप उत्साह पहायला मिळत आहे. 'भूलभूलैय्या २' या कार्तिकच्या सिनेमानं १०० करोड क्लबमध्ये आपला मुक्काम ठोकला आहे. आणि प्रेक्षक पुन्हा पुन्हा सिनेमा पाहण्यासाठी देखील थिएटरमध्ये जात असल्याचं दिसून आलं आहे. या सिनेमात कार्तिकसोबत कियारा अडवाणी आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()