कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) आणि कियारा अडवाणीचा(Kiara Advani) सिनेमा 'भूलभूलैय्या २'(Bhool Bhulaiyaa) बॉक्सऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. ६ दिवसांत जिथे या सिनेमानं ८३ करोड कमावले आहेत तिथे दुसरीकडे हा सिनेमा वादात फसताना दिसत आहे. २००७ मध्ये आलेल्या 'भूलभूलैय्या' सिनेमाच्या सीक्वेलमध्ये मुलांमधील लठ्ठपणावर खालच्या दर्जाचे हास्य-विनोद केल्याचा आरोप होत आहे. सोशल मीडियावर(Social Media) अनीस बझ्मीच्या दिग्दर्शना अंतर्गत बनलेल्या या सिनेमावर आता ट्रोलर्सनी निशाणा साधला आहे.(Kartik Aaryan's 'Bhool Bhulaiyaa 2' Slammed on Social Media)
'रेडिट'वर एका नेटकऱ्यानं 'भूलभूलैय्या २' संदर्भात एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यानं म्हटलंय की,''हा सिनेमा विनोदाच्या नावावर लहान मुलांमधील लठ्ठपणावर टीका करीत आहे. फॅट शेमिंगवर भाष्य करतोय हा सिनेमा. सिनेमात एक मुलगा आहे,ज्याच्या जाड शरीराची कितीतरी वेळा सिनेमात खिल्ली उडवली गेली आहे''. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की,''भूलभूलैय्या २ मधील एका मुलाच्या शरीराच्या वाढलेल्या आकाराची मस्करी करण्यावर तसंच फॅटफोबियावर कोणाला काही बोलायचं नाही का? यावेळी एका मुलाला बॉडीशेमिंग वरनं हिणवलं जात आहे''. पुढे याच नेटकऱ्यानं आणखी विषयाला ताणत लिहिलं आहे की,'आपल्याला वाटतं की पुरुषांना बॉडी फॅटचे इश्यूज नसतात'.
पण यामध्ये इंट्रेस्टिंग गोष्ट ही आहे की,सिनेमाविषयी उलटसुलट बोलणाऱ्या त्या नेटकऱ्याला एका दुसऱ्या नेटकऱ्यानं सिनेमाची बाजू मांडत चांगलंच सुनावलं आहे. सिनेमाला पाठिंबा देताना तो नेटकरी म्हणाला आहे,'हे प्रत्येकाच्या विचार करण्याच्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे. सिनेमातील ती गोष्ट फक्त विनोद म्हणून पाहिली तर तो विनोद आहे आणि उगाचच फॅट शेमिंगशी जोडली तर तो वाद आहे'. एका दुसऱ्या नेटकऱ्यानं यावर लिहिलं आहे की,'मी जेव्हा सिनेमा थिएटरमध्ये पाहत होतो,तेव्हा लोकं त्या मुलाच्या सीनवर हसत होते,सिनेमाचा आनंद घेत होते. जे खरंतर सिनेमा कडून अपेक्षित असतं. इथे फॅट शेमिंगसारखं काहीच नाही'.
'भूलभूलैय्या २' मध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी व्यतिरिक्त तब्बू आणि राजपाल यादव देखील आहेत. २० मे रोजी सिनेमागृहात हा सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमा लवकरच १०० करोडच्या क्लबमध्ये दाखल होईल. बोललं जात आहे की येत्या रविवार पर्यंत हा सिनेमा १०० करोडची कमाई करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.