मुंबई- बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने काही दिवसांपूर्वीच कोरोना व्हायरसवर लोकांना आवाहन करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता...लोकांना त्याच्या या व्हिडिओतील हटके अंदाज आवडल्याने हा व्हिडिओ काही क्षणातंच भरपूर व्हायरल झाला...आणि आता पुन्हा एकदा कार्तिकने याच विषयावर एक नवा व्हिडिओ तयार केला आहे...ज्यात कार्तिक पुन्हा प्रेक्षकांना कोरोनापासून वाचण्यासाठी त्याच्या वेगळ्या अंदाजात आवाहन करत आहे.
अभिनेता कार्तिक आर्यनने कोरोना व्हायरसवर एक नवीन रॅप गाणं तयार केलं आहे..इतकंच नाही तर यावर परफॉर्म करुन हा व्हिडिओ त्याने सोशल मिडियावर शेअर देखील केला आहे..कार्तिकने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो रॅपिंग करतोय..थोडक्यात सांगायचं झालं तर या व्हिडिओमध्ये कोरोना व्हायरचा संसर्ग टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत याबाबत सांगितलं आहे..व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कार्तिकने लिहिलंय, 'जो पर्यंत तुम्ही घरी बसत नाहीत तो पर्यंत मी तुम्हाला आठवण करुन देत राहिल..' यासोबतंच कोरोना स्टॉप करोना, कोरोना रॅप करोना असे हॅशटॅग देखील पसरवायला सांगितले आहेत..
कार्तिकची कोरोना व्हायरसबद्दल लोकांना आवाहन करण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिकने एक मोनोलॉग देखील सादर केला होता..ज्याला लोकांनी खूप डोक्यावर घेतलं..सोशल मिडियावर आता हा नवा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे..
पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी रात्री ८ वाजता देशाला कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी आवाहन केलं होतं..यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन असणार असल्याची घोषणा त्यांनी केली..पंतप्रधान यांनी कोरोना व्हायरसची ही साखळी तोडण्यासाठी २१ दिवस घरातंच राहण्याचं आवाहन केलं होतं..जर हे २१ दिवस सांभाळले नाहीत तर अनेक कुटूंब उद्ध्वस्त होतील..तसंच त्यांनी हे लॉकडाऊन कर्फ्यु असल्यासारखंच समजा असा इशाराही दिला होता..तरीही काही महाभाग रस्त्यावर विनाकारण उतरत असल्याने कार्तिक सारखे सेलिब्रिटी त्यांना वेगवगळ्या पद्धतीने आवाहन करत आहेत...
kartik aryan new video on Coronavirus went viral on social media
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.