Kashmir Files movie iffi festival 2022: सोशल मीडियावर काश्मीर फाईल्सच्या नावाचा ट्रेंड सुरु झाला आहे. गोव्यातील इफ्फीमध्ये नदाव लॅपिड नावाच्या परिक्षकानं या चित्रपटावर केलेली कमेंट आता चर्चेत आली आहे. आव्हांडापूर्वी शिवसेनेचे संजय राऊत यांनी देखील काश्मीर फाईल्स हा भाजपचा चित्रपट असल्याची थेट टीका केली होती.
इस्त्राईलच्या प्रसिद्ध दिग्दर्शक नदावनं दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. काश्मीर फाईल्स हा एक अश्लील आणि प्रोपगंडा करणारा चित्रपट आहे. तो या महोत्सवामध्ये कसा आला याचे मला आश्चर्य वाटते. असे नदावनं म्हटले होते. त्यावरुन आता मनोरंजन विश्वात खळबळ उडाल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात राजकीय, मनोरंजन विश्वातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे नदावच्यावतीनं त्यांच्या राजदुतानं माफी मागितली असली तरी भारतात मात्र हे प्रकरण अद्याप चर्चेत आहे.
हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ..
काश्मीर फाईल्स हा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सतत चर्चेत असतो. हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. गोव्यातील इफ्फीच्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, तो इस्रायली असल्याने मुस्लिम विरोधी "काश्मीर फाईल्स" चालवून घेईल अशी सरकारची अपेक्षा होती. पण "प्रचारकी आणि गलिच्छ" चित्रपट म्हणून मुख्य परीक्षक नदाव लापिडने सणसणीत चपराक लगावली. त्यांच्या या ट्विटला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यावरुन त्यांना देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
यापूर्वी काश्मीर फाईल्समध्ये महत्वाची भूमिका साकारणारे कलावंत अनुमप खेर, निर्माते अशोक पंडित, अभिनेत्री स्वरा भास्कर आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया देत लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.