KBC: गुजरातच्या स्पर्धकाला रामायणच माहीत नाही,अगदी सोप्या प्रश्नाचं चुकवलं उत्तर

सध्या 'कौन बनेगा करोडपती'च्या शो दरम्यान स्पर्धकच नाही तर अमिताभही नवनवीन खुलासे करत चकीत करताना दिसत आहेत.
Kaun Banega Crorepati 14 vijay gupta failed to answer ramayana question
Kaun Banega Crorepati 14 vijay gupta failed to answer ramayana questionGoogle
Updated on

KBC: कौन बनेगा करोडपती १४ च्या लेटेस्ट एपिसोडची सुरुवात २५ ऑगस्टला अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी फास्टेस्ट फिंगर फर्स्ट ने केली. खेळाची सुरुवात नैनीतालचे स्पर्धक प्रशांत शर्मा यांच्यासोबत झाली. प्रशांत शर्मा खेळतही बरे होते. पण त्यांची गाडी अडकली ती ५० लाखाच्या प्रश्नावर . पण त्यांनी हुशारी दाखवली आणि २५ लाख घेत खेळ तिथेच सोडला.(Kaun Banega Crorepati 14 vijay gupta failed to answer ramayana question)

Kaun Banega Crorepati 14 vijay gupta failed to answer ramayana question
Liger: उद्धट विजय पुन्हा बोलला; थेट शाहरुखला दिलं चॅलेंज, म्हणाला,'तू काही...'

प्रशांत शर्मांनंतर अमिताभ यांनी उर्वरीत स्पर्धकांमधून पुन्हा फास्टेस्ट फिंगर फर्स्ट गेम खेळला. यामध्ये सर्वात जलद गतीनं उत्तर नोंदवत गुजरातचे डॉक्टर विजय गुप्ता यांना हॉट सीटवर बसायची संधी मिळत नाही. अमिताभनी जसं विजय गुप्ता यांचे नाव घेतले तसं विजय गुप्ता यांच्या आनंदाला पारावर उरला नाही,त्यांनी थेट आपला शर्ट अंगावरुन काढत भिरकावला आणि हॉट सीटच्या दिशेने धावत सुटले. हे पाहून अमिताभ सोबत सारे उपस्थित हैराण झाले अन् हसू लागले.

Kaun Banega Crorepati 14 vijay gupta failed to answer ramayana question
Taarak Mehta: जेठालालचीही एक्झिट? दिलीप जोशी चालले अमेरिकेला...

विजय गुप्ता यांनी एकदम हॅप्पी मूडमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत गेमची सुरुवात केली. एक हजार,दोन हजार,तीन हजार अशी बक्षिसाची एक-एक पायरी चढत ४० हजारापर्यंत पोहोचले. पण या टप्प्यावर विजय गुप्तांकडून थोडी गडबड झाली. ते खेळ हरले अन् निव्वळ १० हजार रुपये जिंकून परत जावं लागलं.

विजय गुप्ता यांना अमिताभ बच्चन यांनी ४० हजार रुपयांसाठी एक प्रश्न विचारला. तो प्रश्न संबंधित होता रामायणाशी..आता रामायणाच्या कथा हा सगळ्यांच्याच आवडीचा भाग. त्यात गाजलेली टी.व्ही वरची प्रसिद्ध मालिका म्हणून रामायणाकडे पाहिलं जातं. विजय गुप्ता यांना प्रश्न केला होता की,'रावणानं पुष्पक विमान कोणाकडून जबरदस्तीनं घेतलं होतं?'. उत्तरासाठीचे ऑप्शन होते- A)इंद्र B)कुबेर C)जटायू D)माया . या प्रश्नाचं उत्तर 'कुबेर' असं आहे.

विजय गुप्ता यांना या प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते,त्यामुळे त्यांनी 50-50 लाइफलाइन वापरली. पण त्याचाही काही फायदा झाला नाही. त्यानंतर त्यांनी Video call A Friend लाइफलाइनही वापरली. मित्राशी बोलल्यानंतर,त्यांच्या मित्रानं उत्तर दिलं ,विजयने ते लॉक करायला सांगितले. आणि नेमकं ते उत्तर चुकलं. आणि अखेर विजय गुप्ता यांना १० हजार घेऊन हॉट सीट जड मनानं सोडावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.