Kaun Banega Crorepati 14: सोनी टी.व्हीचा सगळ्यात चर्चेत असलेला क्वीझ शो 'कौन बनेगा करोडपती 14' दिवसेंदिवस रंगत चालला आहे. याच्या प्रत्येक भागात काही ना काही धमाका होत आहे आणि तो चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवस आधी कोल्हापूरच्या कविता चावला यांनी एक करोड रुपये जिंकून या सीझनची पहिली महिला करोडपती बनण्याचा सन्मान पटकावला होता. यामुळे दस्तुरखुद्द अमिताभही खूश होऊन भारावल्याचे दिसून आले होते. पण गेल्या एका एपिसोडमध्ये बिग बी एका महिला स्पर्धकावर नाराज दिसले आणि त्यांनी खेळ पुढे सुरु ठेवण्यास नामंजुरी दर्शवली.(Kaun Banega Crorepati 14: Why Amitabh upset On female Cotestant? gets up from his sit and says i cant play...)
'कौन बनेगा करोडपती 14' च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये देबिता दत्ता हॉटसीटवर विराजमान झाल्या. त्या आपल्या बुद्धीनुसार आणि लाइफलाइनच्या मदतीनं 1 लाख 60 हजारच्या प्रश्नावर पोहोचतात पण त्याचं उत्तर चुकीचं दिल्यानं केवळ 10 हजार जिंकून शो सोडून त्यांना जावं लागलं. त्यानंतर बिग बी 10 स्पर्धकांसोबत पुन्हा फास्टेस्ट फिंगर फर्स्ट खेळले. आणि यात बिजल हर्ष सुखानी यांनी जलद उत्तर देऊन हॉट सीटवर बसण्याची संधी मिळवली.
अमिताभ बच्चननी शो चा एक होस्ट म्हणून सुरुवातीला बिजल यांना शो चे सगळे नियम समजावून दिल्यानंतर खेळ सुरु केला. दरम्यानं स्पर्धकाला त्यांच्याविषयी मध्येच अमिताभनी विचारलं तेव्हा बिजल म्हणाल्या,''त्या व्यवसायाने मानसोपचार तज्ञ आहेत. तसंच लहान मुलांच्या क्लिनिकल हिप्नोथेरेपिस्ट आणि बिहेवियर थेरेपिस्ट देखील आहेत''. बिजल यांच्यासोबत शो मध्ये सामिल व्हायला त्यांचे पती आणि आई देखील आले होते.
बिजल यांच्याविषयी जाणून घेतल्यावर अमिताभनी खेळ सुरू केला. पण स्पर्धकाचे लक्ष संगणकाच्या स्क्रीनवर नव्हते,तर त्या इकडे-तिकडे पहात होत्या. त्या म्हणाल्या,''त्यांना भीती वाटत आहे'. आणि हे ऐकल्यावर तत्क्षणी बिग बी आपल्या सीटवरनं ताडकन उठले. आणि त्यांच्या पतीला त्यांनी बोलावून घेतले आणि आपल्या सीटवर बसायला सांगितले अन् स्वतः अमिताभ प्रेक्षकांमध्ये गेले. म्हणाले,''मी अशा परिस्थितीत खेळ पुढे नेऊ शकत नाही''.
बिजल पुन्हा अमिताभना म्हणतात की जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा भिती वाटते मला. आणि बस्स हे ऐकल्यावर बिग बी जोरात हसू लागले आणि उत्तरले की-''जर मी प्रश्न नाही विचारणार तर मग आपण हा प्रश्नोत्तरांचा खेळ कसा खेळणार?'' हास्यविनोद झाल्यानंतर बिजल लाइफलाइनच्या सहाय्याने ८० हजार रुपये जिंकल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.