Kaun Banega Crorepati 15: गेल्या काही दिवसापासून 'कौन बनेगा करोडपती 15' ची जोरदार चर्चा होती. हा एक क्विझवर आधारित शो आहे. ज्याचे होस्ट हे अमिताभ बच्चन आहेत. हा शो चर्चेत आला तो त्याच्या स्पर्धकामुळे.
या शोच्या 15व्या सिझनला त्यांचा पहिला करोडपती मिळाला आणि तो ही 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनाच्या दिवशी. अवघ्या 23 वर्षांचा जसकरणने या शोमध्ये एक करोड रुपये जिंकले त्यानंतर त्याला अमिताभ बच्चन यांनी 7 करोडचा प्रश्न विचारला.
मात्र जसकरण हा 7 कोटींच्या प्रश्नावर अडकला आणि या शोचा विजेता होण्याची त्याची संधी हूकली. अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या 7 कोटींच्या प्रश्नाचे उत्तर तो देऊ शकला नाही.
बिग बिंनी त्याला प्रश्न विचारला की पद्मपुराणानुसार कोणत्या राजाला हरणाच्या शापामुळे शंभर वर्षे वाघाच्या रूपात राहावे लागले? यासाठी त्याला पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नासाठी पर्याय होते, क्षेमधुरि, धर्मदत्त, मीताध्वज की प्रभंजनाय.
या प्रश्नाचे उत्तर जसकरण देऊ शकला नाही. शेवटी त्याने 1 कोटी रुपये जिंकत गेम सोडला. मात्र यावेळी अमिताभ यांनी त्याला उत्तराचा पर्याय काय निवडला असता असं विचारलं तेव्हा त्याने C म्हणजेच मिताध्वज हा पर्याय निवडला मात्र त्याचे उत्तर पर्याय D म्हणजे प्रभंजना होते.
जसकरणने 1 कोटी रुपये जिंकल्यानंतर, बिग बींनी इतर स्पर्धकांसोबत पुढचा खेळ सुरू केला. त्यावेळी 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' मध्ये अश्विनी कुमार ही स्पर्धक हॉट सीटवर पोहचली. आता तिचा खेळ पहाणे मनोरंजक ठरणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.