'कौन बनेगा करोडपती' हा लोकप्रिय टीव्ही शो आहे. या शो मधून प्रेक्षकांचे मनोरंजनच नाही तर त्यांच्या ज्ञानात भरही पडते. यंदा या शोचा 15वा सीझन सुरु आहे.
हा सिझन 14 ऑगस्ट 2023 पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आत्ता या शोला सुरु होऊन बरेच दिवस झाले असून आत्तापर्यंत या शो मध्ये आपण अनेक स्पर्धक पाहिलेत ज्यांनी चांगली कामगिरी करत पैसे जिंकले.
मात्र अत्तापर्यंत या सिझनमध्ये कोणताही स्पर्धक करोडपती होऊ शकला नाही. त्यापुर्वीच त्यांचा प्रवास संपला.
एक कोटीचा प्रश्न आल्यानंतर अनेक स्पर्धकांनी त्यांचा खेळ तिथेच थांबवला. पण आता शोच्या 15 व्या सीझनचा पहिला करोडपती आता मिळणार आहे.
'कौन बनेगा करोडपती' च्या निर्मात्यांनी याचा प्रोमो सोशल मीडियावर शेयर केला आहे. सोनी टीव्हीने शेअर केलेल्या या प्रोमोत पंजाबमधील स्पर्धक जसकरण सिंगने 1 कोटींची रक्कम जिंकली आहे. आता जसकरण पुढिल प्रश्नाचे उत्तर देत सात कोटी पर्यंतची रक्कम जिंकतो की नाही हे पहावं लागेल.
सोनी टीव्हीने दाखवलेल्या प्रोमोमध्ये, अमिताभ बच्चन हे आपल्या जागेवरून उभे राहतात आणि जसकरणने एक कोटी रुपये जिंकल्याची घोषणा केली. घोषणा करताच ते त्याला जाऊन मिठी मारतात.
त्यानंतर जसकरणचा खडतर प्रवास दाखवण्यात आला. तो पंजाबमधील अतिशय छोटं गाव खालराचा रहिवासी आहे. जसकरण यात सांगतो की त्याच्या गावातील खुप क्वचितच लोक हे पदवीधर झाले आहेत. त्याला त्याच्या गावातून कॉलेजला जायला चार तास लागतात.
21 वर्षीय जसकरण हा अती सामान्य घरातला आहे. तो युपीएससीची तयार करतोय. पुढच्या वर्षी तो पहिल्यांदाच पेपर देणार आहे. ही त्याची पहिली कमाई आहे.
आता अमिताभ हे जसकरणला 16 वा प्रश्न विचारताय. 16व्या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या स्पर्धकाला 7 कोटी रुपये मिळतात.
त्यामुळे आता जसकरण हा या प्रश्नाचे उत्तर देत 7 कोटी रुपये जिंकणारा पहिला स्पर्धक होत इतिहास रचतो की फक्त 1 कोटी रुपये घेऊन घरी जातो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. हा एपिसोड 4 व 5 सप्टेंबर रोजी प्रसारित केला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.