Kaun Banega Crorepati Amitabh Bachchan Fees : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध रियॅलिटी शो म्हणून ज्याचे नाव घेतले जाते त्या केबीसी (कौन बनेगा करोडपती) ची लोकप्रियता मोठी आहे. मागील दीड दशकांहून अधिक काळ या रियॅलिटी शो ने प्रेक्षकांना, चाहत्यांना जिंकून घेतले आहे.
बिग बी अमिताभ बच्चन यांनी या शो ची होस्टिंगची धूरा सांभाळली आहे. त्यांच्या त्या होस्टिंगचे असंख्य चाहते आहेत. अमिताभ बच्चन यांच्या होस्टिंगमुळे केबीसीची उंची वाढल्याचे दिसून आले आहे. या शो च्या माध्यमातून हजारो स्पर्धकांनी लाखो रुपयांची बक्षीसं जिंकली आहेत. त्यामध्ये कित्येक बॉलीवूडमधील सेलिब्रेटींचा देखील समावेश आहे.
फॅमिली इंटरटेनर शो म्हणून केबीसीकडे पाहिले जाते. या मालिकेची गोष्टच वेगळी आहे. सोशल मीडियावर केबीसीशी संबंधित काही मीम्स देखील व्हायरल होत असतात. तसेच त्यात सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या गमतीजमतीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. सध्या केबीसीच्या शो साठी बिग बी अमिताभ बच्चन किती मानधन घेतात याची चर्चा सुरु आहे.
बिग बी अमिताभ बच्चन यांना केबीसीच्या प्रत्येक शो साठी दिले जाणारे मानधन हे मोठे असल्याचे सांगण्यात येते. अमिताभ यांना त्यांच्या पडत्या काळात या रियॅलिटी शो ने मोठा आधार दिल्याचे त्यांनीच अनेक मुलाखतींमधून सांगितले आहे. २००० साली पहिल्यांदा केबीसीचा शो प्रेक्षकांसमोर आला. तेव्हापासून हा शो प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करताना दिसून आला आहे.
एशियन टीव्ही न्यूज आणि सियासॅट (Siasat) यांच्या एका रिपोर्टनुसार बिग बी यांनी पहिल्या सीझनमधील प्रत्येक एपिसोडसाठी २५ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर सीझन ५ मधील एपिसोडसाठी एक कोटी रुपयांचे मानधन घेतले होते. सहाव्या आणि सातव्या सीझनसाठी देखील बिग बी यांना दीड ते दोन कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते.
आठव्या सीझनमध्ये किती होतं मानधन...
आठव्या सीझनविषयी सांगायचं झाल्यास बिग बी यांना एका एपिसोडसाठी दोन कोटी रुपये एवढे मानधन मिळत होते. तर ९ व्या सीझनसाठी दिली जाणारी रक्कम ही अडीच कोटी आणि दहाव्या सीझनला ३ कोटींचे मानधन दिले गेले. यानंतर अकरा ते तेराव्या सीझनपर्यत बिग बी यांना दिले जाणाऱ्या मानधनात फारसा फऱक नव्हता.
आता १४ व्या आणि १५ व्या सीझनसाठी चार ते पाच कोटी रुपयांचे मानधन घेतल्याची चर्चा आहे. अमिताभ यांच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ते आगामी काळात प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांच्यासोबत एका वेगळ्या विषयावरील चित्रपटात दिसणार आहेत .
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.