baharla ha madhumas Viral Video: 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे दिग्दर्शित शाहीर साबळे यांचा जीवनपट उलगडणारा हा चित्रपट आता अवघ्या काही दिवसातच आपल्या भेटीला येणार आहे.
महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांचा संपूर्ण जीवनप्रवास काही महत्वाचे प्रसंग या चित्रपटातून आपल्याला दिसणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची एक झलक म्हणजे टीझर समोर आला होता ज्यामध्ये लता मंगेशकर, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, साने गुरुजी अशा अनेक दिग्गजांचे दर्शन घडले.
आता याच चित्रपटाच्या निमित्ताने मराठी मनोरंजन विश्वातील जवळचे मित्र म्हणजे केदार शिंदे, भारत जाधव आणि अंकुश चौधरी एकत्र आले आहेत. केवळ एकत्र आले नाहीत तर ते चक्क एका ट्रेंडिंग गाण्यावर थीरकले आहेत. हा व्हिडिओ नुकताच केदार शिंदे यांनी शेयर केला आहे.
(kedar shinde bharat jadhav ankush chaudhari dance together on most trending song Baharla Ha Madhumas in maharashtra shaheer movie)
या सिनेमातलं ''बहरला हा मधुमास'' (Baharla ha madhumas) हे गाणं सोशल मीडियावर खूप ट्रेंड झालं आणि अजूनही होत आहे. अनेक कलाकारही या गाण्यावर थिरकत आहेत. या गाण्याची भुरळ पडली नाही असं कुणीही नाही. अंकुश चौधरी आणि सना शिंदे यांच्यावर हे गाणं चित्रित झालं आहे.
विशेष म्हणजे केदार आणि भरतलाही या गाण्यावर नाचण्याचा मोह आवरला नाही. एक भन्नाट व्हिडिओ शेयर करत ''आम्हालाही मोह आवरता आला नाहीच.'' असे कॅप्शन केदारने दिलं आहे.
या व्हिडिओत महाराष्ट्र शाहीर मधील बहरला हा मधुमास या गाण्यावर हे तिघे धम्माल डान्स करताना दिसत आहेत. डान्स कोरिओग्राफर या तिघांना डान्स स्टेप शिकवत आहे. तिच्या मागे केदार - भरत - अंकुश हे तिघे डान्स करताना दिसत आहेत. या तिघांसोबत केदार शिंदेची लेक सना सुद्धा दिसतेय. येत्या २८ एप्रिल २०२३ ला ''महाराष्ट्र शाहीर'' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.