Kedar Shinde Post: 'बहरला हा मधुमास..' या गाण्याचं original casting...', केदार शिंदेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

शाहीर साबळे आणि भानुमती साबळे यांचा एक दुर्मिळ फोटो पोस्ट करत केदारनं महाराष्ट्रा शाहीर सिनेमाविषयीच्या लोकांच्या उत्सुकतेला अधिक वाढवलं आहे.
Kedar Shinde Post On Maharashtra Shahir Movie
Kedar Shinde Post On Maharashtra Shahir MovieInstagram
Updated on

Kedar Shinde Post: सध्या 'महाऱाष्ट्र शाहीर' सिनेमाची जिकडे तिकडे चर्चा पहायला मिळत आहे. जेव्हापासून सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय तेव्हापासून तर सिनेमाविषयीची उत्सुकता अधिक पहायला मिळत आहे.

या सिनेमातील 'बहरला हा मधूमास नवा..' या गाण्यानं तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला दिसत आहे. याच गाण्यासंदर्भात पोस्ट करताना केदारनं एक फोटो एक पोस्ट केला ज्यानं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. (Kedar Shinde Post On Maharashtra Shahir Movie)

Kedar Shinde Post On Maharashtra Shahir Movie
Sana Shinde Exclusive: अंकुशला 'काका' म्हणणाऱ्या सनाने सांगितला त्याच्यासोबत रोमॅंटिक सीन करतानाचा 'तो' अनुभव..

आता ही बातमी तर जगजाहीर आहे की केदार शिंदे शाहीर साबळे यांच्या जीवनचरित्रावर 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा घेऊन लवकरच आपल्या भेटीस येत आहे. या सिनेमातील शाहीरांची भूमिका अंकुश चौधरी साकारत आहे तर त्यांची पत्नी भानुमती साबळे यांची भूमिका केदारचीच मुलगी सना शिंदे साकारत आहे.

Kedar Shinde Post On Maharashtra Shahir Movie
The Kapil Sharma Show: त्यानंतर कपिलनं आपल्या शो मध्ये 'तो' शब्द कधीच वापरला नाही.., जाणून घ्या प्रकरण..

केदारनं नुकताच शाहीर साबळे आणि भानुमती साबळे यांचा एक जुना दुर्मिळ फोटो शेअर करत लिहिलं आहे की, ''बहरला हा मधूमास... या गाण्याचं original casting. शाहीर साबळे आणि भानुमती साबळे... आज #महाराष्ट्र शाहीर या सिनेमा विषयी आपल्या रसिकांची उत्सुकता पाहून त्यांनाही खुप आनंद होत असावा.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()