'मोबाईल थिएटर ही शाहीर साबळेंची संकल्पना '.. केदार शिंदेंनी सांगितल्या आठवणी

जागतिक रंगभूमी दिनी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्या नाटकांविषयीच्या आठवणी सांगत शाहीर साबळे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी सध्या चर्चेत असलेले 'मोबाईल थिएटर' ही संकल्पना शाहीर साबळे यांनी रुजवली असे केदार शिंदे म्हणाले.
kedar shinde and shahir sabale
kedar shinde and shahir sabale google
Updated on

MARATHI DRAMA : आज जागतिक रंगभूमी दिन जगभरात साजरी करण्यात आला. हा दिवस रंगभूमीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. महाराष्ट्रासह जगभरातील रंगकर्मी हा दिवस आपापली कला सादर करत साजरा करतात. या दिवसाची खास आठवण दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

kedar shinde and shahir sabale
Harnaaz sandhu : पोलिसांच्या कुटुंबियांसोबत नाचली मिस युनिव्हर्स हरनाझ संधू..

केदार शिंदे म्हणजे शाहीर साबळे यांचे नातू. शाहीर साबळे यांचा लोकरंगभूमीचा वारसा पुढे घेऊन केदार शिंदे मनोरंजन सृष्टीत स्वतःचा ठसा उमटवत आहे. केदार शिंदे, भारत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर असे अनेक दिग्गज रंगकर्मी शाहीर साबळे यांनी घडवले. त्यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाने जगाला वेड लावले. याच शाहीर साबळे यांनी त्याकाळी 'मोबाईल थिएटर' (mobile theatre) ही संकल्पना महाराष्ट्रात रुजवली, अशी महत्वाची माहिती केदार शिंदे यांनी जागतिक रंगभूमी दिनी दिली.

kedar shinde and shahir sabale
Shah Rukh Khan : ५६ व्या वर्षीही तब्येत अशी की पाहून डोळे फिरतील..

'रंगपंढरी' या यु ट्यूब वाहिनीसाठी केदार शिंदे यांची मुलाखत घेण्यात आली होती. मुलाखतकार म्हणून मधुराणी प्रभुलकर यांनी ही मुलाखत घेतली आहे. गेल्यावर्षी ही मुलाखत प्रदर्शित करण्यात आली होती. या मुलाखतीतील एक छोटासा भाग केदार शिंदे यांनी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त फेसबुक आणि इंस्टाग्राम वर शेअर केला आहे.

kedar shinde and shahir sabale
भारती सिंग या दिवशी होणार आई, म्हणाली कधीही येऊ शकतं बाळ...

'नाटक ही माझे गरज आहे. मला उगाच वैचारिक बोलता येत नाही. नाटक ही अशी गोष्ट आहे जी सहज व्हायला हवी आणि आतून यायला हव,' अशी भावना रंगभूमीप्रती केदार शिंदे यांनी व्यक्त केली आहे. बाबा म्हणजेच शाहीर साबळे म्हणायचे एखादे नाटक करताना तुला गम्मत वाटायला हवी. बाबा लोककला, लोकनाट्य प्रवाहातून आले आणि त्यांनी मुक्तनाट्य साकारलं. गल्ली बोळातलं नाटक त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर आणलं आणि यशस्वी करून दाखवलं, अशा आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत.

kedar shinde and shahir sabale
बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अजित पवारांच्या मुलाचा फोटो चर्चेत..

'मोबाईल थिएटर ही संकल्पना बाबांनी उदयास आणली. आज आपण मोबाईल थिएटर विषयी गप्पा मारतो पण त्याकाळी बाबांनी एक बस आणि एक ट्रक घेऊन गावोवर नाटक सादर केले. एका गाडीत नाटकाचा रंगमंच असायचा जिथे सादरीकरण व्हायचे आणि एका गाडीत नाटकाचे साहित्य, नेपथ्य असायचे. ज्या गावांची नावेही आपल्याला माहित नाही अशा गावांमध्ये जाऊन त्यांनी नाटक केले,' असे केदार शिंदे म्हणाले. प्रभाकर पणशीकर, बाबूजी ही मंडळी मला कायमच आदर्शवत वाटतात कारण त्यांनी नाटक जनमानसात रुजवलं. नाटकाविषयी चार लोकांत मोठ्या गप्पा मारण्यापेक्षा नाटक रुजवणं महत्वाचं. असेही ते म्या मुलाखतीत म्हणाले आहेत. लवकरच केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' हा शाहीर साबळे यांचा जीवनपट उलगडणारा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.