kedar shinde on arun kadam: महाराष्ट्रातील एक हरहुन्नरी दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे. नाटक, मालिका असो किंवा चित्रपट. केदार शिंदे यांचा प्रॉजेक्ट आहे म्हणजे सगळ्यांचे डोळे तिथेच लागलेले असतात.
आज केदार शिंदे ही नाव महाराष्ट्रातच नाही तर जगभरात पोहोचलेलं आहे. त्याचे चित्रपट सातासमुद्रापार गाजले आहेत. नुकताच त्यांचा 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावरील या चित्रपटाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे.
अशातच केदार शिंदे याच चित्रपटाच्या निमित्ताने 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमात गेले होते. यावेळी त्यांचा एक जुना मित्र भेटला. आज त्याच्याच विषयी केदार शिंदे यांनी एक भावनिक पोस्ट शेयर केली आहे.
(Kedar Shinde shared post on actor arun kadam maharashtrachi hasya jatra)
केदार शिंदे यांनी ज्या अभिनेत्या विषयी पोस्ट शेयर केली आहे, तो अभिनेता आहे कॉमेडीकहा अलग रीदम अशी ख्याती असलेला अरुण कदम. अरुण कदम आणि केदार शिंदे यांनी एकेकाळी एकत्र केले आहे.
एवढेच नाही तर अरुण कदम यांनी केदार शिंदे यांना कित्येकदा आर्थिक मदतीचा हात दिला आहे. आज केदार यांनी त्याच सगळ्या भावनिक आठवणींना उजाळा दिला आहे. अरुण कदम यांच्या सोबत एक फोटो शेयर करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
केदार शिंदे लिहितात, ''बरेच दिवस झाले या आमच्या मित्राविषयी म्हणजे सर्वांचा लाडका दादुस अरूण विषयी लिहायचं होतं. पण जमलंच नाही. महाराष्ट्र शाहीर च्या प्रमोशनसाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये गेलो होतो. त्यावेळेच्या हा खास फोटो.''
हेही वाचा: Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
''अरूण आणि माझी मैत्री १९९० पासून. माझ्या अनंत सुखदुःखात तो महत्वपूर्ण भूमिकेत होता. आमच्या सगळ्यांमध्ये लवकर सेटेल होणारा, घसघशीत कमाई करणारा पहिला अरूणच. आर्थिक विवंचना असल्यावर हातात पैसे ठेवणारा अरूणच.''
पुढे ते लिहितात.. ''कित्येक दिवस मी त्याच्या बीएमसी ॲाफिसात काढल्या आहेत. त्याच्या जीवावर पोट भरलं आहे. आमच्यात वयाने खुप मोठा पण, त्याची मस्करी करताना ते कधीच डोक्यात येत नाही. गण गवळण बतावणी आम्ही दोघं लोकधारामधे सादर करायचो. त्याच्या डोळ्यात दिसायचं की, पुढचं वाक्य तो विसरला आहे. पण अविर्भाव असा असायचा की, समोरचा वाक्य विसरला आहे.
''आता आम्ही एकत्र फार काम करत नाही. पण त्याची प्रगती पाहून अभिमान वाटतो. आत्ताच्या पिढीतील मुलांसोबत तो त्याच उर्जेने काम करतो हे पाहून मन भरून येतं. खुप शुभेच्छा अरूण.''अशी आठवण केदार शिंदे यांनी सांगितली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.